चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. राजीव अनिल देशमुख यांना विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर नियुक्ती करण्याची मागणी

Read Time3 Minute, 37 Second

प्रति,
मा .शरदचंद्र पवार साहेब
खासदार राज्यसभा

विषय – चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. राजीव अनिल देशमुख यांना विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर नियुक्ती करण्याची मागणी करणे संदर्भात

महोदय,
श्री. राजीव अनिल देशमुख हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २००९-२०१४ या काळात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी होते. आपल्या घरातुनच राजकीय व सामाजिक कार्याचा वसा लाभलेल्या राजीव दादांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने चाळीसगाव नगरीचा कायापालट केला. अनेक महत्वाकांक्षी योजना राबवुन तालुकावासीयांचे जीवन सुखकर केले. कुठल्याही प्रश्नावर उचित उत्तर हा त्यांचा काम करण्याचा स्वभाव आहे. आपल्या महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेद्वारे थेट धरणावरुन शहरात पाणी आणुन त्यांनी दुष्काळतही तालुकावासीयांना पाण्याचे दुर्भिक्ष भासु दिले नाही. ते खऱ्या अर्थाने समस्त चाळीसगावकरांचे ‘भागीरथ’ ठरले आहेत.

मा. राजीव दादांनी नेहमीच चारित्र्यवान आणि सुसंस्कृत राजकारण केले. त्यांच्यातल्या उत्तम प्रशासकाने कधीही तालुक्याचे सामाजिक सौहार्द बिघडु दिले नाही. परंतु पैसा आणि धाकदपटशा च्या जोरावर राजकारण करण्याची संस्कृती आणि भ्रष्ट राजकारणी पुढे आल्याने मा. राजीव दादांसारखा नितीवान व्यक्ती बाजुला सारला गेला.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा ४००० इतक्या निसटत्या मतांनी पराभव झाला. ही मतसंख्या अगदीच नगण्य आहे. आजही समस्त चाळीसगाव वासियांच्या मनातला लोक प्रतिनिधी हे राजीवदादाच आहेत. आपल्या संयमी आणि प्रभावी कार्यकतृत्वाने ते तालुका वासियांचे खरे लोकनायक ठरले आहेत.

तरी महोदय, आपणास विनंती आहे की, सर्वार्थाने कार्यक्षम ठरलेल्या नेत्यास आपण विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्त करुन, समस्त चाळीसगाव वासियांच्या जनभावनांचा उचित सन्मान करावा…
प्रति
मा. जयंत पाटील
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
मा.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य
मा.सुप्रियाताई सुळे खासदार लोकसभा
आकाश पोळ अध्यक्ष-पीपल्स सोशल फाऊंडेशन चाळीसगाव यांनी वरील पत्र मेल करून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. राजीव अनिल देशमुख यांना विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर नियुक्ती करण्याची मागणी केली आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post राजेशमामा गायकवाड यांची दाैंड नगरपालिका कम्युनिटी किचन ला मदत
Next post चाळीसगावातील रोटरी परिवाराकडून PPE किट चे वाटप…
error: Content is protected !!
%d bloggers like this: