संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जेव्हा पासून भुयारी गटारीचे काम सुरू झाले आहे तेव्हा पासून शहरातील जागृत नागरिक तक्रारींचा पाढा वाचत आहेत.पण नगरपालिका प्रशासन फक्त आश्वासन देत आहे भुयारी गटारीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई मात्र होत नाही आत पुन्हा रयत सेनेला आश्वासन दिले आहे आता तरी कारवाई होईल ही अपेक्षा चाळीसगावकरांना आहे-जागृत चाळीसगावकर
चाळीसगाव(प्रतिनिधी)- चाळीसगाव शहरातील सर्व प्रभागातील रस्ते नव्याने करावे तसेच न पा तर्फे वाढीव घरपट्टी कमी करावी,व स्व. सुवर्णाताई देशमुख उद्यानात नगरपरीषदेने सुविधा कराव्यात या मागणीसाठी रयत सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांच्या उपस्थितीत दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले मुख्याधिकारी बाहेरगावी असल्याने न पा अभियंता प्रदीप धनके यांनी सर्व मागण्या पूर्ण करू व ठेकेदारावर कारवाई करू असे आश्वासन दिल्यावर रयत सेनेने आंदोलन थांबवले मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल असा ईशारा यावेळी देण्यात आला.
चाळीसगाव शहरात मलनिसारण योजनेतुन भूमिगत गटारीच्या पाईपलाईनचे कामे ऐन पाऊसाळ्यात सुरू असून रस्त्यावर काळी माती पसरल्यामुळे चिखल झाला त्या चिखलातून मार्ग काढताना दुचाकी चालकाना व पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासला सामोरे जावे लागत आहे तर चिखलामुळे काही महिला व दुचाकी चालकांचे चिखलात घसरून पडल्याने छोटी मोठी दुखापत देखील झाल्या आहेत. पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या चारीमध्ये फक्त मातीचा भराव मनमानी पध्दतीने संबंधित ठेकेदार करत असताना नगरपरिषदेचे अभियंता प्रदीप धनके या कामाची तपासणी करत नाही त्यामुळे ठेकेदार नित्कृष्ट कामे करत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला नित्कृष्ट कामामुळे पहिल्या पावसात चाऱ्या खचून जाऊन मोठ मोठे खड्डे पडले आहेत.संबंधित ठेकेदाराने मलनिसारण भूमिगत योजेनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार केला आहे त्याची वरीष्ठ स्तरावरून चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी. ज्या प्रभागात भूमिगत गटारींचे कामे झाल्यानंतर लागलीच नगरपरिषदे तर्फे संबंधित ठेकेदाराला रस्ते बनविण्यासाठी वर्क ऑर्डर काढून रस्ते करणे गरजेचे असताना शहरातील नागरिकांना भर पाउसाळ्यात रस्त्यावरील चिखलाच्या खाईत टाकण्याचे काम केल्याने शहर वासीयामध्ये नगरपरिषदे विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.येत्या सात दिवसात सर्व प्रभागातील डाबरीकरणाचे रस्ते न झाल्यास रयत सेनेच्या वतीने वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलनात करण्यात येईल असा ईशाराही यावेळी देण्यात आला तसेच चाळीसगाव नगर परिषदे कडून चालू वर्षी घरपट्टीमध्ये वाढ करण्यात आले आहे ही वाढ जनतेला न परवडणारी आहे आज मीतीस नगर परिषदेमध्ये सत्ताधारी अथवा विरोधक नगरसेवक नाहीत सध्या प्रशासक म्हणून कारभार सुरू असल्याने यास वाचा फुटत नाही त्यामुळे नगर परिषदेमार्फत मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे लवकरात लवकर वाढवलेली घरपट्टी कमी करावी व शहरात शहरातील बस स्टॅन्ड जवळील स्व. सुवर्णाताई देशमुख उद्यानात सुविधाचा अभाव आहे या ठिकाणी शहरातील जनता सकाळी व सायंकाळी जॉगिंग व व्यायामासाठी येते तसेच आई-वडील लहान मुलांना घेऊन मनोरंजनासाठी येत असतात व्यायाम व जॉगिंग व फिरण्यासाठी असलेले ट्रक त्याच्या सोयी सुविधा अपुरे आहेत या प्रकारचा जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे लवकरात लवकर जॉगिंग ट्रॅक ची दुरुस्ती करावी व्यायामासाठी आधुनिक साहित्य लावावेत तसेच उद्यानातील शौचालयाची नियमित साफसफाई करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या व जवळपास दोन तास आंदोलन करण्यात आले व मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाही तर रयत सेना नागरिकांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयासमोर यापेक्षा भव्य बेमुदत जनआंदोलन करेल असा ईशारा देण्यात आला मात्र मुख्याधिकारी बाहेरगावी असल्याने न पा अभियंता प्रदीप धनके यांनी सर्व मागण्या पूर्ण करू व ठेकेदारावर कारवाई करू असे आश्वासन दिल्यावर रयत सेनेने आंदोलन थांबवले मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल असा ईशारा यावेळी देण्यात आला.आंदोलनात रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार, भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे प्रदेशाध्यक्ष खुशाल पाटील,प्रदेश कार्याध्यक्ष विजय पाटील, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, प्रदेश समन्वयक पी एन पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, उपाध्यक्ष गोकुळ पाटील,कार्याध्यक्ष गोविंद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,अनिता ताई शर्मा,भरत नवले, विलास मराठे ,रमेश पवार, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हिरेकर, शहराध्यक्ष छोटू अहिरे ,शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, संघटक दीपक देशमुख, प्रशांत आजबे ,मयूर चौधरी, राहुल कुमावत, दिनेश गायकवाड ,श्रीकांत तांबे, मनोहर पवार शुभम नवले, बाळू तांबटकर, सतीश पवार ,देवेंद्र पाटील, शिवाजी गवळी, ज्ञानेश्वर सोनार ,कुणाल पाटील,राजेंद्र पाटील, अमोल खैरे ,अभिजीत शिंदे,आरीफ पेंटर, तसेच सिमा शर्मा, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अरुण पाटील,कुणाल पाटील, अनिल चौधरी,भागवत पाटील,दिपक पवार,आर बी जगताप,हरीष पवार,अजीज खाटीक,असलम मुल्ला,राजु पगार ,दिनेश चौधरी,दिपक शिंदे यांच्यासह रयत सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निवेदनाची प्रत रवाना
मुख्यमंत्री म. रा. मुबंई, नगररचना मंत्री म. रा. मुबंई,मा.विरोधी पक्षनेता म. रा. मुबंई,पालकमंत्री जळगाव,जिल्हाधिकारी जळगाव,खासदार जळगाव,आमदार चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव,पोलीस निरीक्षक . शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव