अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव(प्रतिनिधी)-2 लाखाच्या उसनवारी च्या बदल्यात दिलेला चेक बाऊन्स झाल्याने परत आला म्हणून दाखल केलेल्या खटल्याचा निकालात सेवानिवृत्त शिक्षकास 1 महिना तुरुंगवास व 2 लाख 75 हजार रुपये दंडाची शिक्षा
2 लाखाची उसनवारी घेत सेवानिवृत्त शिक्षक नारायण जेठवणी यांनी किरण कारडा यांना 2 लाखाचा धनादेश दिला होता सदर धनादेश बँकेत सादर केल्यानंतर खात्यात शिल्लक नसल्याने न चेक बाऊन्स झाल्याने किरण कारडा यांनी खटला दाखल केला या खटल्याचा निकाल किरण कारडा यांच्या तर्फे लागला असून सेवानिवृत्त शिक्षक नारायण जेठवणी यांना 1 महिना तुरुंगवास व 2 लाख 75 हजार रुपये दंडाची शिक्षा न्या.श्री.गांधे यांनी खटल्याचा निकाल देत सुनावली
किरण कारडा यांच्या वतीने सुप्रसिद्ध वकील रफिक सैय्यद यांनी युक्तिवाद करत चेक बाऊन्स प्रकरणी विविध पुरावे सादर करत बाजू मांडली होती 23 ऑगस्ट रोजी निकाल लागला असून किरण कारडा यांनी बोलतांना सांगितले की आमचा न्यायव्यस्थेवर पूर्ण विश्वास होता आरोपीतर्फे आमच्या परिवाराची बदनामी करण्यात आली मात्र शेवटी विजय सत्याचा झाला आहे.