अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक,उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल पॉईंट) जवळील स्टेशन रोड व धुळे रोड यामधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर छत्रपती शिवरायांचा पुतळा व्हावा या मागणीसाठी संभाजी सेनेने अनेक वर्षांपासून विविध आंदोलने केलेली आहे मागील महिन्यातील १४ मे २०२० रोजी म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती दिनी महाराष्ट्र भरातील २१०० संभाजी सैनिक आत्मदहन करतील असा इशारा देखील दिला होता परंतु कोरोना या महामारीच्या कायदेशीर बाबी मुळे आम्हास आंदोलन करता आले नाही.
काल दिनांक १५ जून रोजी नगराध्यक्षा मा. आशालता विश्वास चव्हाण यांनी विवीध विकास कामांची पाहणी केली. त्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस सुरु असलेल्या शिवसृष्टी च्या कामाची देखील पाहणी केली
म्हणून बरेच झाले पाहणी करून झाली आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे प्रत्यक्ष काम आता लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी संभाजी सेना करीत आहे
या मागणी साठी यापूर्वी देखील अनेकविध आंदोलने संभाजी सेनेने केलेली सर्वश्रुत आहे प्रसंगी आम्ही आमचे निवडक मावळ्यांसह आत्मदहन करून मरणाची देखील तयारी केलेली होती आणि ती आजही आहेच, आम्हाला श्रेय नको पुतळा पाहिजे आहे आम्हाला आमच्या राजाचा पुतळा तिथे डौलाने दिमाखात उभारलेला बघायचा आहे
तरी पुतळ्याच्या कामाला दिनांक ३० जून पर्यंत प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही तर शिवप्रेमींना सोबत घेऊन संभाजी सेनेचे लढवय्ये संभाजी सैनिक आपल्या निवासस्थानासमोर किंवा आपल्या नगर परिषदेतील नगराध्यक्षांच्या दालनामध्ये बसून बेमुदत ठिय्या आंदोलन करतील प्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस सर्वस्वी आपण आणि आपले शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या नावाने दिले असून निवेदन सदर कामाचे अभियंता विजय पाटील यांनी स्वीकारले असून निवेदन स्वीकारताना नगरसेवक रामचंद्र जाधव, जगदीश चौधरी व सामाजिक कार्यकर्ते भीमाचा किल्ला जिमचे अध्यक्ष रोशन जाधव हे देखील उपस्थित होते निवेदनावर संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ तालुकाध्यक्ष गिरीश पाटील शहराध्यक्ष अविनाश काकडे प्रदेश संघटक सुनील पाटील,शहर कार्यध्यक्ष ज्ञानेश्वर पगारे,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील,दिवाकर महाले,सुरेश महाले,समाधान पाटील,अमोल सोनवणे,प्रवीण पाटील,राकेश पवार,रवींद्र शिनकर,कृष्णा पाटील,संदीप जाधव, नामदेव पाटील, बापूराव पाटील ,महेंद्रशिंग राजपूत,ईश्वर अहिरे ,ऋषिकेश मोरे,मच्छिद्र कोळी, कृष्णा गवळी, सचिन जाधव, राकेश जोशी, नीलकंठ साबणे, आधार महाले, किरण पांगरे, रवींद्र नाईक , संजय आल्हाट, विजय देशमुख, पंकज गठरी, भैय्यासाहेब देशमुख ,रवींद्र महाजन,अमर भोई, स्वप्नील महाजन, प्रमोद महाजन निलेश सोनार ,घनश्याम सोनार, सुधीर पाटील , विजय पाटील,मनोज पाटील इत्यादींच्या सह्या असून निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार उमेश पाटील जिल्हाधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव उपविभागीय पोलिस अधिकारी चाळीसगाव तहसीलदार चाळीसगाव पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना देण्यात आल्या आहेत