छत्रपती शिवराय रयतेचे जाणते राजे तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांचे एरंडोल शिवजयंती उत्सव प्रसंगी प्रतिपादन

Read Time6 Minute, 4 Second


एरंडोल(प्रतिनिधी):-दि 19 फेब्रुवारी 2020 रोजी एरंडोल येथे ,सार्वजनिक शिवजयंती उत्सव प्रसंगी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सालाबादाप्रमाणे माल्यार्पण झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत मनोगते व्यक्त झाली. यावेळी उपस्थित एरंडोलच्या तहसीलदार अर्चना खेतमाळीस म्हणाल्या की, राजे छत्रपती शिवराय हे सर्व रयतेला व सर्वसामान्यांना आधार वाटणारे जाणते राजे होते . त्यांच्या जन्म मुळे आपल्याला स्वराज्य लाभल . छत्रपती शिवरायांची कार्यपद्धती प्रत्येकाने जगण्याची गरज आहे.
त्यांचे विचार आजही शासन-प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील सर्वांना दिशा देणारे आहे त. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगरीचे माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ महाजन होते. व्यासपीठावर एरंडोल पोलीस स्टेशनचे पीआय स्वप्निल ऊनवणे, एरंडोल नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण देशमुख, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्क्ष राजू आबा चौधरी, किशोर भाऊ निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमित दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मनोज पाटील, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माजी नगराध्यक्ष विजय भाऊ महाजन, निवृत्त तहसीलदार अरुण माळी, प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव, माजी उपनगराध्यक्ष शालिक भाऊ गायकवाड, विद्यमान उपनगराध्यक्ष बबलू चौधरी पैलवान नगरसेवक योगेश महाजन नगरसेवक अभिजित पाटील युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन, ईश्वर बिऱ्हा डे, जगदीश दादा ठाकूर, शिवसेनेचे रमेश आण्णा महाजन, डॉक्टर सुरेश दादा पाटील,शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश दादा पाटील, पंचायत समितीचे सदस्य विवेक भाऊ पाटील, आर डी पाटील,प्राध्यापक आर एस पाटील, मराठा सेवा संघाचे एरंडोल तालुका अध्यक्ष तथा शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर, राजेंद्र शिंदे पालिकेचे कार्यालय अधीक्षक संजय ढमाळ, रवी अण्णा महाजन,सुकलाल महाजन, अजय पाटील, स्वप्नील सावंत, नंदू भाऊ जगताप, माजी नगरसेवक नरेंद्र पाटील, ग्रामीण उन्नती मंडळाचे सचिन भाऊ विसपुते,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना एरंडोल पोलीस स्टेशनचे पीआय स्वप्नील सोनवणे म्हणाले की,छत्रपती शिवरायांची जयंती व सर्वच यांच्या एरंडोल शहरात शांततेत सर्व जयंत्या सर्व समावेशाने साजरी होतात ही एरंडोल ची खासियत महत्त्वपूर्ण आहे. यानंतर पालिकेच्या वतीने बोलताना छत्रपती शिवराय असे एकमेव राजे होऊन गेले कि पिढ्यानपिढ्या त्यांचे नाव अजरामर राहील असे
पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी आपल्या भाषणात म्हटले.
यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित दादा पाटील यांनी छत्रपती शिवरायांनी त्याकाळात मावळ्यांना एकत्रित करून उभारलेल स्वराज्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले.
प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केल. आभार गजानन पाटील यांनी व्यक्त केले.अध्यक्ष मनोगतात माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ महाजन यांनी छत्रपती शिवरायांच्या विचाराने सर्वांनाच प्रेरणा मिळते असे म्हटले. यावर्षी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ वंदन केले माता बहिणीची संख्या लक्षणीय होती.रॅलीद्वारे येऊन शोभायात्रा द्वारे संपूर्ण शहरात छत्रपती शिवरायांचा जयघोष केला. सालाबादाप्रमाणे दुपारी चार पासून राजे छत्रपतींच्या सजीव देखावेद्वारे व सामाजिक बांधिलकीच्या संदेश देणारे फलक आदीसह हजारो युवक समाजबांधव व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे उपस्थित भव्य मिरवणूक शहरातून निघाली
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजे संभाजी पाटील मित्र मंडळ एरंडोल चे सर्व पदाधिकारी, सकल मराठा समाज ,मराठा क्रांती मोर्चा ,संभाजी ब्रिगेड , एरंडोल शहरातील सर्व मराठा समाज बांधव आदींनी परिश्रम घेतले.

.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post चर्मकार उठाव संघ व सेवा योग बहुद्देशीय संस्थे तर्फे आगळी वेगळी जयंती साजरी
Next post ईश्वर अल्लाह एक है… राम रहीम एक है…! चा नारा देत तमाम धुळेकर जनतेला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा — आमदार डॉ. फारूक शाह
error: Content is protected !!
%d bloggers like this: