जनसामान्यांने स्वीकारलेले नेतृत्व,सुमेध बाबा भोसले यांचा वाढदिवस प्रचंड जनसमुदयाच्या साक्षीने व शिवचरित्र व्याख्यानाने संपन्न

0 0
Read Time5 Minute, 9 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 26 मार्च रोजी पोतदार शाळेच्या शेजारी भव्य दिव्य स्टेज व भव्य अशा शामियान्यात प्रचंड जनता जनार्दनाच्या उपस्थितीत सूमेध बाबा भोसले यांचा वाढदिवस संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात शिवव्याख्याते प्रदीपजी देसले यांच्या शिवचरित्राच्या व्याख्यानाने झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील नाट्यमय प्रसंग आपल्या ओघवत्या व जोशपूर्ण शैलीत सांगुन तरुणाईला मंत्रमुग्ध केले तसेच फुले,शाहू,आंबेडकर,भगतसिंग यांच्या जीवनचरीत्रावर ही त्यांनी तरुणाई ला शिव व्याख्याते प्रदिप देसले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रामराव पाटील यांनी केले. व्यासपीठावर प्रदिपदादा देशमुख , दुध संघाचे संचालक प्रमोदबापु पाटील, दिनेशभाऊ पाटील, सभापती अजय पाटील, भगवान बापु राजपुत, योगेश राजधर पाटील, रामचंद्रभाऊ जाधव, श्यामभाऊ देशमुख, प्राचार्य डॉ. एस. आर जाधव., प्रा. डॉ. मनोज शितोळे, भैय्यासाहेब पाटील, दिलीप देशमुख, बंटी ठाकुर व अनेक मान्यवर उपस्थित होते. भव्य दिव्य अशा स्टेज वर सुरवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत सूमेध बाबा भोसले यांचा आकर्षक असा पुष्प गुच्छ देऊन व केक कापुन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी फटाक्यांची प्रचंड आताशबाजीने काही काळ वातावरण निशब्द झाले.वाढदिवसाला झालेली गर्दी पाहता सुमेध बाबा यांच्या नेतृत्वास जनसामान्यांनी स्वीकारले असल्याचे चित्र निर्माण झाले होते, गावातुन एक सारखे घोषणा देत तरुणांचे लोंढेच्या लोढे फटाक्यांची आतषबाजी करत हार तुरे भेटवस्तू घेऊन कार्यक्रम स्थळी येत होते व आपल्या युवा नेत्याला शुभेच्छा देत होते.आणी नम्रपणे सुमेध बाबा भोसले शुभेच्छा स्वीकारत होते. यावेळी माता भगिनींनी त्यांचे औक्षण केले व त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी सर्व वातावरण आनंदाने भारावले होते. चाळीसगाव शहरात हजारो तरुणांच्या माता भगिनींच्या उपस्थित साजरा झालेला वाढदिवस अनेक दिवस चर्चेचा विषय राहील व सुमेध बाबा यांना समाजकार्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल. उपस्थित जनसमुदयाचे सुमेध बाबा भोसले यांनी नतमस्तक होऊन आभार मानले.

समाजहितासाठी, सत्कार्यासाठी, दिन दलितांच्या, शोषितांच्या, गोरगरीब जनतेच्या उत्थानासाठी मी सदैव कटिबद्ध राहील, आपण माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. शहरातील समाजहिताच्या विधायक कामासाठी मला केव्हांही बोलवा मी सदैव माझ्या परीने मदत करेल असे त्यांनी नम्रपणे अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी समोर बसलेल्यांना हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायाला अश्वासित केले. व स्नेहभोजना शिवाय कोणीही जाऊ नये हि विनंती सुमेध बाबांनी केली.

समाजातील वेगवेगळ्या स्तरातील जाती धर्मातील लोक तसेच शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर सदर वाढदिवसाच्या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. एकंदरीत हा वाढदिवस डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला आणी एक प्रकारे कृतज्ञता सोहळा ठरला. यावेळी सूमेध बाबा भोसले यांच्या शालिन सुसंस्कृत, विनम्र समाजसेवी व्यक्तिमत्त्वाचा उपस्थितीतांना परिचय झाला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.