Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

जमिया विद्यापीठातील हिंसाचार व CAB NRC बिला विरोधात विद्यार्थी संघटनांची निदर्शने सर्व विद्यार्थी संघटनांचा सहभाग.

0
2 0
Read Time3 Minute, 58 Second

औरंगाबाद(प्रतिनिधी): दि.१८ डिसेंबर २०१९ रोजी १२ वाजता विद्यापीठाच्या मुख्य कमानी समोर निदर्शने

जमिया इस्लामीया विद्यापीठ येथे CAB व NRC बिलाविरोधात प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल व विद्यापीठ परिसरात घुसून दिल्ली पोलीसांनी गोळीबार करत लाठीचार्ज करून शेकडो विद्यार्थ्यांना गंभीर जखमी केले त्यात काही विद्यार्थी मृत्युमुखी पडले हा प्रकार संविधानिक अधिकारांचा उल्लंघन करणारा असल्याने या विरोधात सर्व परिवर्तन व संविधानवादी विद्यार्थी संघटनांनी दि.18 डिसेंबर रोजी शैक्षणिक बंद ची हाक देत सरकारी दडपशाही विरोधात रणशिंग फुंकले व शैक्षणिक बंद पुकारला होता या बंद मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
बंद नंतर दुपारी मध्ये सहभागी सर्व विद्यार्थी व संघटनांच्या वतीने विद्यापीठ गेट येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

यात विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती.
या बंद मध्ये एमआयएम विद्यार्थी आघाडी,रिपब्लिकन विद्यार्थी सेना,सम्यक विद्यार्थी आंदोलन,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, ऐसेफाय, एनएसयुआय,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,सत्यशोधक विद्यार्थी संघटना,स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन,आजाद युवा ब्रिगेड,एसडी पीआय,मुस्लिम युथ फोरम, आदी संघटनांनी सहभाग घेतला

नवखंडा महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थिनीनी जुब्लि पार्क,घाटी परिसर ते विद्यापीठ गेट अशी निषेध रॅली काढत बंद मध्ये सहभाग घेतला या रॅलीत शेकडो विद्यार्थी व महाविद्यालयाचे शिक्षक सहभागी झाले होते.

पोलिसराज मुर्दाबाद,भारतीय संविधानाचा विजय असो,संघर्षो के आदी है हम आंबेडकरवादी है,संविधान के सन्मान मे छात्रशक्ती मैदान मे,NRC CAB चले जाव, संघवाद मुर्दाबाद,दडपशाही मुर्दाबाद अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

डॉ.कुणाल खरात,सचिन निकम, गुणरत्न सोनवणे,अमोल दांडगे, प्रकाश इंगळे,बिलाल जलील,राजू पठाण, अब्दुल रेहमान खान , अझीम पटेल, adv रुबिणा सय्यद,शफीक पटेल, शेहरोज खान , नवाज कुरेशी,निलेश आंबेवाडीकर,लोकेश कांबळे,नितीन वाहूळे,ऍड अतुल कांबळे,अविनाश कांबळे,अमोल घुगे,पवन साळवे,महेंद्र तांबे,भीमराव वाघमारे,राहुल खंदारे,अनिल दिपके,गुरू कांबळे,स्वप्नील गायकवाड,,मुबिन अन्सारी,शाफिक पटेल,दाऊद आजाद,आकेब खान,मोहेंमीन खान,ऋषिकेश कोरके,अक्षय जाधव,मनीष नरवडे,वैभव बोडखे,ऍड.रुबिना सय्यद,झीनत फातेमा,जयश्री शिर्के,प्रबोधन बनसोडे,आदी सहभागी होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: