अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलीक

चाळीसगाव-आज दि 7 सप्टेंबर 2020 सोमवार रोजी टाकली ग्रामपंचायत व वाहतूक शाखा चाळीसगाव तर्फे मास्क न लावणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली यावेळी काही वाहन चालकांनी चूक मान्य करत दंड दिला तर काही वाहन चालक मात्र चूक तर मान्य करणे दूर उलट डोकलावत असल्याचे चित्र दिसत होते जर नागरिकच काळजी घेणार नाही तर प्रशासन तरी करणार काय असा प्रश्न निर्माण होतो,मात्र कारवाई करणारे कर्मचारी व पोलीस मात्र दंडात्मक कारवाई सोबत लोकांना मास्क चे फायदे व शासन नियमांचे पालन करण्याचे आव्हान करत होते यावेळी मौजे टाकळी प्र चा येथे मास्क न लावणाऱ्या लोकांवर दंडात्मक कार्यवाही करतांना के एन माळी वि अ ग्रा पं प स चाळीसगाव व ग्रामसेवक खरजई,न्हावें , बोरखेडे बु,व सर्व ग्रामपंचायत स्तरीय कर्मचारी,पोलीस हवालदार रावते,सूर्यवंशी,पोलीस नाईक प्रशांत पाटील,सचिन अडावतकर,बाप्पु पाटील,पोलीस शिपाई विजय पाटील,दीपक जगताप आदी उपस्थित होते
