संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगाव(प्रतिनिधी)-जिल्ह्यात लाच लुचपत विभागाच्या कारवाया जोरात तरी लाचखोर काही थांबेना पुन्हा एकदा लाचखोर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे,आज दि.18 रोजी जळगाव शहरातील आदर्श नगर कक्ष महावितरणाचा वरिष्ठ तंत्रज्ञ(वायरमन) 25 हजार रूपयांची लाच घेताना जळगाव एसीबीने रंगेहाथ पकडले असुन संतोष भागवत प्रजापती (वय 32)वरिष्ठ तंत्रज्ञ(वायरमन) आदर्श नगर कक्ष म.रा.वि.वि.कंपनी जळगांव रा.जळगांव जि.जळगांव वर्ग-4 यास 25 हजारांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे.या कारवाईने जिल्ह्यात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांचे आईचे नावाने घराचे जुने विज मिटर असुन यातील संतोष भागवत प्रजापती यांनी विज मिटर हे जुने असून नादुस्त आहे. तुम्हाला नविन मिटर बसावावे लागेल त्यासाठी मला 25 हजार रुपये द्यावे लागतील असे तक्रारदार यांस सांगितले, त्यांनतर आज दि.18 रोजी संतोष प्रजापती यांनी पंचासमक्ष 25 हजार रुपयांची लाचेची मागणी करून यातील आलोसे यांनी पंचा समक्ष 25 हजार रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांच्यावर रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक परिक्षेत्र नाशिक विभागीय पोलीस अधिक्षक श्रीमती.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व अपर पोलीस अधिक्षक श्री.माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली,जळगांव जिल्ह्याचे ला.प्र.विभाग पोलीस उप अधीक्षक,सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री.सुहास देशमुख,सापळा प्रमुख पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव,स.फौ.दिनेशसिंग पाटील,पो.ना.बाळू मराठे या पथकाने मोठी कारवाई केली,या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे,पो.ना.सुनिल वानखेडे,पोकॉ राकेश दुसाने,स.फौ.सुरेश पाटील,पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर,पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ.सचिन चाटे,पो.कॉ.प्रणेश ठाकुर,पो.ना सुनिल वानखेडे, पो.कॉ अमोल सुर्यवंशी,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव या पथकाने मदत केली.