‘जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त परमहंस हरिगिरीबाबा समाधी संस्थान चाळीसगाव येथे शिबीर संपन्न’

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)-माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे दि.१२ जून २०२३ रोजी ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ निमित्त शिबीर तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि तालुका वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले. सदर शिबीरात अॅड. कविता जाधव, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन केले. अॅड.सौ.माधुरी बी.एडके, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाचे बळी-योजना २०१५ त्यांच्या कायदेशीर समस्यांचे निराकरण, पुनर्वसन आणि प्रत्यावर्तन समस्या, त्यांना शासकीय योजनांशी जोडण्यास मदत करणे’ या विषयावर मार्गदर्शन केले. श्री.सचिनकुमार भुपेंद्र दायमा, पी.एल.व्ही. तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव यांनी ‘अन्न व सुरक्षा कायदेशीर अधिकार मानक कायदा-२००६’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात ‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित बालकांना बिस्कीट वाटप करण्यात आले. सदर शिबीरात, अॅड.श्री.संग्रामसिंग शिंदे, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव, श्री.देवेश दिपक पवार, पी.एल.व्ही. तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव, श्री.जर्नादन नारायण लोहारकर, चेअरमन परमहंस हरिगिरीबाबा समाधी संस्थान चाळीसगाव, आशासेविका सौ.मालती मोरे व सौ. जयश्री आगोणे तसेच परिसरातील नागरिक व बालक उपस्थित होते. तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के.पवार, वरिष्ठ लिपीक, श्री.के.डी.पाटील, शिपाई यांनी पाहिले. अॅड.श्री.प्रमोद बी.आगोणे, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.