अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव शहर प्रतिनिधी गफ्फार शाह
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता आज दि 29 जुलै 2020 बुधवार रोजी टाकळी ग्रामपंचायत अंतर्गत मास्क न लावणाऱ्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कारवाईत मास्क ना लावणाऱ्या वाहन चालकांकडून 100 रु प्रत्येकी दंड वसूल करण्यात आला लोकांनी जागरूक व्हावे शासन नियमांचे पालन करून सहकार्य करावे या साठी ही कारवाई करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी अतुल जयवंतराव पाटील यांनी सांगितले या दंडात्मक कारवाईत गटविकास अधिकारी अतुल जयवंतराव पाटील,आर आय पाटील ,के एन माळी,डी डी शिक्रे सर्व वी अधिकारी,एस सुर्यवंशी ग्रा विकास अधिकारी तसेच ग्रा पंचायत कर्मचारी कमलेश जाधव,आकाश दोखले,नितीन मरसाळे,निलेश पवार आदींचे सहकार्य लाभले,
या दंडात्मक कारवाई जनते कडून कौतुक होत आहे पण सदर दंडात्मक कारवाई आज पुरता न करता पुढे पण चालू ठेवावी म्हणजे लोकांना दंडाच्या भीतीने का होईना मास्क लावण्याची सवय तरी होईल.