टायगर ग्रुप च्या प्रयत्नांना यश,उत्तर प्रदेश येथील सतना गावातील वयोवृद्ध बाबा पाहोचले सुखरुप घरी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगांव(प्रतिनिधी)-आज च्या महागाईच्या युगात पोटाची मुले आई वडिलांच्या सांभाळ करत नाही मात्र टायगर ग्रुप चाळीसगांव च्या वतीने एका अनोळखी वृद्धास 4 दिवस सांभाळ करत 3 दिवसांपूर्वी नातेवाईकांना संपर्क करून बोलवत काल दि 13 जुलै रोजी बाबांना नातूच्या स्वाधीन केले.
इतक्या दिवसाची धावपळ गुरुपौर्णिमेच्या रात्री संपली बाबा आपल्या घरी सुख रूप पोहचले, सन्माननीय तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक, सैनिक ग्रुपचे सर्व पदाधिकारी,राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे राजेंद्र आहेर साहेब, अँटी करप्शन कमिटीचे दिवेदी साहेब,अश्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेची भेट म्हणून आम्ही दिलेली आहे तरी गुरूंनी याचा स्वीकार करावा आमच्या गुरूंना गुरुपौर्णिमेची दक्षिणा तसेच श्री. गोकुळ प्रल्हाद पाटील 06006280990,रावसाहेब कोळी 9860180858 महेंद्र घुमरे 9373656840 एक हात मदतीचा जर कधी कोणाला मदत लागली असे आजी आजोबा या कोणी निराधार दिसले संपर्क साधावा जय हिंद-रावसाहेब कोळी टायगर ग्रुप
शहरातील टायगर ग्रुप ने एक अनोळखी वृद्धाची काळजी घेत एक उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे,उत्तर प्रदेश येथील सतना गावाच्या आजोबा चुकून चाळीसगांव शहरात आले होते,त्यांची भेट टायगर ग्रुप चे रावसाहेब कोळी यांच्याशी झाली असता बाबांना कोळी यांनी आपुलकीने विचारणा केली असता बाबांना ऐकु येत नसल्याचे लक्षात आले व बाबांपाशी एका चिट्टीत त्यांच्या घराचा नंबर मिळून आला त्या नंबर वर संपर्क साधला असता बाबांच्या नातेवाईकांनी त्यांच्या येई पर्यंत बाबांना सांभाळण्याची विनंती केली त्यांना येण्यासाठी 3 दिवस लागले मात्र बाबांचा एकूण 4 दिवस संभाळ कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला,व त्यांच्या आलेल्या नातूच्या ताब्यात बाबांना देण्यात आले असून या सत्कर्मासाठी टायगर ग्रुप चे रावसाहेब कोळी तसेच टायगर ग्रुप चे महेंद्र बिलाखेडकर यांचे योगदान लाभले.