चाळीसगाव(प्रतिनिधी): हैद्राबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा देशभरातून निषेध होत आहे. शहरातील सिद्धी महिला मंडळाच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यावेळी महिला मंडळाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे व शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना निवेदन सादर करण्यात आले. या अमानुष घटनेची चौकशी जलदगती न्यायालयात व्हावी. दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रेड्डी कुटूंबियाच्या दु:खात व वेदनेत आम्ही सहभागी आहेत. अशा घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
डाॅ. प्रियंका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून तिला जाळण्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेचा निषेध करुन आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली. स्टेशन रोड येथून मुक मोर्चास सुरुवात करण्यात येवून सिग्नल पॉईंट येथे मेणबत्त्या पेटवून डॉ. प्रियंका रेड्डी हीस श्रध्दांजली वाहण्यात आली.
सिद्धी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ उज्वला देवरे, स्वयंदिपच्या अध्यक्षा मिनाक्षी निकम, प्रियंका शिरसाठ, सरोज जाधव, सरला साळुंखे, नगरसेविका अलका गवळी, सविता राजपूत, शमा चव्हाण, नयना पाटील, रेखा पाटील, राजश्री पाटील, सुवर्णा राजपूत, मनिषा पाटील, हिराबाई भोई, चंदा अग्रवाल, हेमलता शर्मा, सीमा खंडेलवाल, मनिषा चव्हाण, अनिता अहिरराव, मंगला पाटील, कविता बागूल, रेखा राजपूत, वर्षा वाघ, देवयानी पाटील, ममता निकम, प्रतिभा पाटील, रेखा राजपूत, भारती अहिरराव, सुनिता राजपूत, वंदना पाटील, संध्या गुप्ता, कविता चौधरी आदी महिलांच्या वतीने झालेल्या कृर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ सुनिल राजपूत, अध्यक्ष डॉ संदीप देशमुख, सचिव रोशन ताथेड, राजेंद्र कटरिया, बाळासाहेब सोनवणे, आ बं हायस्कूलचे चेअरमन प्रदीप अहिरराव, गणेश बागड, ब्रिजेश पाटील, माजी नगरसेवक अनिल जाधव, वसुंधरा फाउंडेशनचे सचिन पवार, जिल्हा लंगडी असोसिएशनचे सचिव राहुल वाकलकर, निरज कोतकर, स्वप्नील धामणे, राहुल पाटील, संजय अग्रवाल, विनोद बोरा, संदीप जैन, जितेंद्र राजपूत आदींनी यात सहभाग घेत निषेध व्यक्त करीत रॅलीत सहभाग नोंदविला