संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-ए ए शाह एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो हायस्कूल चाळीसगाव येथील विध्यार्थ्यांचे शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन करून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेस 3 विद्यार्थी पात्र झाले आहेत यामुळे नक्कीच अँग्लो उर्दू हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचे गुण ओळखत खेळाडू तयार करण्यास शिक्षकांनी सुरवात केली आहे.
नुकत्याच के आर कोतकर कॉलेज च्या पटांगणात झालेल्या थाळी फेक स्पर्धेत अँग्लो उर्दू हायस्कुल च्या 17 वर्ष खालील गटात अखलाख जिया इकबाल खान याने थाळी फेक मध्ये प्रथम क्रमांक तर वय वर्ष 14 खालील गटात अयान शाह मुसा थाळी फेक द्वितीय क्रमांक व तनाज तन्वीर खाटीक थाळी फेक द्वितीय क्रमांक मिळवला.
विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक शेख गुलाम हुसेन यांचे मार्गदर्शन मिळाले मुख्याध्यापक आसीफ खान व शिक्षक, शिक्षकेतर यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विध्यार्थ्यांनी मैदानी खेळांकडे वळायला हवे हे विद्यार्थ्यांना मिळालेले यश म्हणजे नक्कीच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरेल यात शंका नाही तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांचे देखील गुण ओळखत खेळाडू तयार करण्याचे काम शिक्षक करत आहे पालकांनी देखील यासाठी पुढे यावे-मुख्यध्यापक सलीम खान सर