चाळीसगांव(प्रतिनिधी दि 24)आज रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांचे उपस्थितीत सोबत सपोनि आशिष रोही, सपोनि मयूर भामरे, पोलिस अंमलदार पंढरीनाथ पवार, भटु पाटील, विनोद भोई, विजय पाटील, दीपक पाटील, मपोशि सबा खान या पथकासह चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी 07:30 वाजताचे सुमारास टाकळी प्र चा गावाचे शिवारात तसेच तितुर नदीचे पूर्व व पश्चिम बाजूचे नदीपात्राजवळील 05 गावठी हातभट्टी दारूच्या भट्ट्यावर धडक कारवाई करण्यात आली असून, सदर ठिकाणी कच्ये पक्के रसायन, गावठी हातभट्टीची तयार दारू, नवसागर, गूळ, प्लास्टिक ड्रम, लोखंडी बेरेल असे एकूण 85,875 रुपयाचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे.
05 आरोपीविरोधात चाळीसगाव पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व भादंवि अंतर्गत साथरोग प्रसाराचा संसर्ग पसरविणारी हयगयीची व जोखमीची कृती केलेबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींची नावे-
1) जयवंताबाई जयराम सोनवणे, वय- 45 वर्षे ,
राहणार -टाकळी प्र चा
2) संतोष सजन दळवी,
वय- 40 वर्षे,
राहणार- टाकळी प्र चा
३) काशिनाथ उर्फ सोन्या सजन दळवी
वय- 25 वर्षे ,
राहणार- टाकळी प्र चा
4) छोटू संतोष भिल,
वय-34वर्षे,
राहणार- टाकळी प्र चा
5) अनिता सजन दळवी,
वय-33 वर्षे,
राहणार-टाकळी प्र चा.