प्रतिनिधी(चाळीसगाव): आज दि. ११/१२/२०१९, बुधवार रोजी दत्त पौर्णिमेचे औचित्य साधून मतिमंद मुलांची अनिवासी शाळा, डेराबर्डी, चाळीसगाव येथे रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे क्रीडा साहीत्य वाटप करण्यात आले तसेच त्यांना मिष्टान्न वाटप करण्यात आले, तसेच रोटे हरीश भाई पल्लन यांच्याकडून फुल नाही तर फुलाची पाकळी स्वरूपात रोख ५०१/- रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब चे सदस्य रोटे राजेंद्र कटारिया,प्रकल्प प्रमुख रोटे सुभाष जाधव ,संग्रामसिंग शिंदे, भास्कर पाटील, सुभाष सराफ, बलदेव भाई पुंशी, समकित छाजेड ,सह. प्रकल्प प्रमुख गणेश बागड, व सचिव रोशन ताथेड यांच्यासह डॉ सुनील राजपूत हे सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी रोटरी दर वर्षी या दिव्यांगांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांची सेवा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करते असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात डॉ संदीप देशमुख यांनी केले, व डॉ सुनील राजपूत यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी अनोखी भेट दिल्याने त्यांचे आभार मानले. यावेळी शाळेचे संचालक श्री हेमंत पाटील सर यांनी आभार सर्व मान्यवरांचे आभार मानले.