चाळीसगाव तालुक्यात दहा दिवस गणितासाठी उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी,गणितात विद्यार्थ्यांचा उंचावला स्तर

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)- : इयत्ता 01 ली ते इयत्ता 07 पर्यंतच्या जिल्हा परीषद शाळांमधील 21381 विद्यार्थ्यांसाठी 10 ऑक्टोबर 2023 ते 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत दहा दिवस गणितासाठी हा उपक्रम चाळीसगाव तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यात आला.जिल्हाधिकारी मा.श्री. आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. अनिल झोपे, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून, श्री. विकास पाटिल, शिक्षणाधिकारी प्राथ. व श्री. सचिन परदेशी, शिक्षणाधिकारी माध्य. यांच्या नियोजनातून दहा दिवस गणितासाठी हा उपक्रम चाळिसगाव तालुक्यात यशस्वी पणे राबविण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दहा दिवसांचा कृति कार्यक्रम आखला गेलेला होता. या कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवस निहाय गणिताच्या मूलभूत क्षमतांचे अध्ययन व अध्यापन करण्याचे नियोजन केले गेले होते. गणनपूर्व तयारी, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, भागाकार अशा क्रियांचा समावेश करण्यात आलेला होता. या दहा दिवसांमध्ये फक्त गणित या विषयाचे अध्यापन करण्याच्या शिक्षकांना सूचित करण्यात आले होते. रोजच्या रोज त्याचा आढावा केंद्रनिहाय केंद्रप्रमुखांकडे शाळांनी दिलेली माहिती संकलित होऊन गटशिक्षणाधिकारी कार्यालय चाळीसगाव येथे त्याची एकंदरी करून जिल्हाला पाठवण्यात येत होत. विद्यार्थ्यांचा गणिताचा पूर्वीचा स्तर व दहा दिवस गणित या उपक्रम राबवल्यानंतरचा स्तर उंचावलेला दिसत आहे.
दहा दिवस गणिताचे या उपक्रमाची या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून शिक्षकांनी सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया याबद्दल दिलेल्या आहेत.शनिवारी दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी दहा दिवस गणिताचे या उपक्रमाची मूल्यमापन चाचणी घेण्यात आली. या मूल्यमापन चाचणीमधून विद्यार्थ्यांचा स्तर उंचावलेला दिसतो आहे. दररोज गटशिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी, गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी व केंद्रांचे केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून शाळा भेटी करण्यात आलेल्या आहेत.
गटशिक्षणाधिकारी श्री . विलास भोई यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘शाळा स्तरावर शिक्षक व विद्यार्थी यांनी या प्रकल्पाचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलेले आहे. गणित साहित्याच्या माध्यमातून, गणित पेट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन केले गेले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो आहे. ‘

दहा दिवस गणितासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. प्रथम विद्यार्थ्यांची पूर्वस्थिती जाणून घेण्यात आली. तसेच इयत्ता निहाय कृती कार्यक्रम देण्यात आला. इयत्ता पहिली ते सातवी साठी इयत्ता निहाय घटक व कृती निश्चित करण्यात आल्या. यात संख्याज्ञान,बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार यांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कृती घेतांना गणित पेटीतील साहित्य व स्वनिर्मित साहित्य यांचा वापर या उपक्रमासाठी केला. विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान व गणिती क्रियांचे दृढीकरण होण्यासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरला. निश्चितच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संख्याज्ञान व गणिती क्रिया या क्षमतांमध्ये वाढ झाली. यातून गुणवत्ता विकास होण्यास मदत झाली-डॉ.ओमप्रकाश रतन थेटे ( उपशिक्षक )
जि. प. प्राथमिक शाळा पिंपळगाव प्र.दे.

दहा दिवस गणितासाठी ‘ या उपक्रमात ठरविलेल्या क्षमतानुसार चाचणीच्या आधारे विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करण्यात आली .या उपक्रमात खरोखरच विद्यार्थ्यांना काही नवीन पद्धतीने गणित शिकण्याची संधी मिळाली .
या उपक्रमुळे विद्यार्थ्यांच्या गणित क्षमता उंचावली आहे. सतत दहा दिवस गणित शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषय बाबत असलेला भय काही प्रमाणात कमी झाला आहे. विद्यार्थी मध्ये गणित बाबत काही प्रमाणात आवड निर्माण झाली आहे. दहा दिवस गणित साठी हा उपक्रम चा उद्देश प्राप्त झाला आहे , असे आम्हाला वाटते .
भविष्यात असेच काही नवीन उपक्रम येणे गरजेचे आहे , जेणे करून विद्यार्थ्यांना काही नवीन भेटल्यासारखे होईल-श्रीमती सुवर्णा शालिग्राम बाविस्कर पदवीधर शिक्षक जि. प. उच्च प्रा. शाळा बेलदारवाडी