अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
पुणे-गेल्या दहा वर्षापासून रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती करणार व यामध्ये कोणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली .आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची सहविचार सभा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात पार पडली .या सभेला सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले उपस्थित होते .पदोन्नतीने जिल्हा परिषद सातारा येथे त्यांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .या सहविचार सभेत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले .गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली मुख्याध्यापकांची पदोन्नती करण्यात येणार असून ही प्रक्रिया करताना कोणावरही अन्याय होणार नाही दक्षता घेणार असल्याचे श्री आयुष प्रसाद यांनी सांगितले .मुख्याध्यापक पदावरून पदावन्नत करण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या पगाराला संरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे .त्यामुळे या शिक्षकांना कोणताही आर्थिक बोजा सहन करावा लागणार नाही .पदावन्नत करण्यात येणाऱ्या शिक्षकांसाठी समायोजन करते वेळी समानीकरणासाठी राखीव ठेवलेल्या जागासह सर्व जागा खुल्या करण्यात येतील .यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही . सर्वांना सोयीच्या शाळा मिळण्यास मदत होईल . जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वेळेत देण्याचे नियोजन करण्यात येत आहे .वरिष्ठ वेतन श्रेणी चे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले असून अपूर्ण असलेल्या ५८प्रस्तावातील त्रुटी पंधरा दिवसात पूर्ण करून घेण्यात येणार आहेत .निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षण डाएटमार्फत देण्यात येईल .एनपीएस धारक शिक्षकांसाठी वेबिनार आयोजित करून या योजनेबाबत माहिती देण्यात येणार आहे .जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्ग व इतर संवर्गाची बिंदुनामावली लवकर पूर्ण करून घेण्यात येईल .बारावी सायन्स असलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक या पदावर पदोन्नती देण्याबाबत निर्णय झाला असून त्यांनी पदवीसाठी बहिस्त प्रवेश घेणे आवश्यक आहे .प्रलंबित वैद्यकीय बीले पंधरा दिवसात मंजूर करण्यात येतील .शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांना शेलार्थ प्रणालीचे प्रशिक्षण डायटमार्फत देण्यात येईल . या सहविचार सभेला मुख्य व वित्त लेखा अधिकारी अभिजीत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले ,प्रशासन अधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे , राज्यमहासचिव विठ्ठल सावंत, जेष्ठ उपाध्यक्ष विनोद चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सलवदे सर, जिल्हा महासचिव मिलिंद थोरात, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पवार सर, हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड , अप्पासाहेब जगताप नेते दौंड तालुका, श्री दतात्रय नावडकर दौंड ,श्री विकास वायाळ ,पंकज झिटे ,संदीप बेंद्रे , ‘शिवप्रसाद गुट्टे ,कोळवण,मुळशी तालुका प्रा . जिभाऊ बच्छाव , श्रीमती बच्छाव मॅडम , विजय जाधव सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मुळशी हे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते .