अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-दि 27 सप्टेंबर 2021 सोमवार रोजी शेतकरी हितांसाठी काँग्रेस तर्फे भारत बंद आंदोलन करण्यात आले होते याचाच भाग म्हणून दौंड काँग्रेस तर्फे दौंड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
निवेदनात म्हटले आहे की जनतेला भरमसाठ खोटी आश्वासन देवून केंद्रामध्ये सत्तेत आलेले भाजप सरकार ज्या हुकुमशाही पद्धतीने राजवटीने, आणलेल्या शेतकरी विरोधी तिन काळ्या कायद्याच्या विरोधात, दिल्ली मध्ये मागील ११ महिन्यापासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा व कामगारांना बरबाद करण्याऱ्या कायद्याविरोधात, देशातील पेट्रोल, डिझेल, व घरगुती गॅस जिवनावश्यक वस्तुंची केलेली दरवाढ व महागाई करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात तिव्र स्वरूपाचा निषेध करीत आहोत हे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले यावेळी दौंड विधानसभा अध्यक्ष विठ्ठल दोरगे पाटील,उपाध्यक्ष महेश जगदाळे,तालुका महासचिव प्रकाश सोनवणे,दौंड तालुका उपाध्यक्ष अरविंद दोरगे,सरचिटणीस पुणे युवक काँग्रेस मोसीन तांबोळी व कार्यकर्ते उपस्थित होते.