दौंडमध्ये अवकाळी पावसामुळे विज कोसळल्याने बैलगाडी सोबत ट्रॅक्टरने घेतला पेट….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-: तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व अवकाळी पावसाला सुरुवात….
दौंड शहरासह ग्रामीण भागात संध्याकाळी साडेआठ ते पावणे नऊ वाजायच्या सुमारास विजेचा कडकडाट सुरू झाला,त्यानंतर जोराचा वारा सुटला व थोड्या वेळाने अचानक पावसाला सुरुवात झाली.
या अवकाळी पावसामध्ये आज दौंड शहरातील स्वामी समर्थ या भागामध्ये राहणारे माजी उपसरपंच, गणेश जगदाळे यांच्या घरासमोरच वीज पडल्याने ,त्यांच्या दारात उभी असलेल्या बैलगाडीने पेट घेतला.
या आगीमुळे बैलगाडीच्या शेजारीत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरनेही आग पकडली.पण सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे सांगितले जात आहे.परंतु नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.