दौंड दि 30 -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरावर उपाययोजना सुरू असताना व कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संचारबंदी घोषित केली असून .सर्व उद्योग व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले असून कोरोणावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व वाईन शॉप बंद करण्याचे दिले असता.तरीही काही तळीरामांचा अवैद्यरित्या दारू विकण्याचा सुळसुळाट मात्र थांबायला तयार नाही.दौंडमध्येही असाच अवैद्यरीत्या दारू विकत आहे अशी माहिती दौंड पोलिस प्रशासनाला मिळताच दौंड शहरातील विविध ठिकाणी धाड टाकण्याचे सत्र सुरू केले असून दौंड शहरात पोलिसांकडून दारू माफियांचे कंबरडे मोडायला सुरुवात झाली आहे.गोवा गल्ली ६००० रुपयांची दारू जागीच नष्ट करण्यात आली. व गजानन सोसायटी(आरोपी बालाजी कांबळे याला ताब्यात घेण्यात आले आहे) ११००४ रुपयांची दारू जप्त करण्यात आली ही कारवाई दौंड पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पो.हवा.थोरात,शेख,सुळ,पो.ना. देवकाते.शेख,काळे.यांनी केली.
Read Time1 Minute, 42 Second