Read Time1 Minute, 52 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-:दौंड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेली २५ वर्षे राष्ट्रवादीची एक हाती सत्ता असताना दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी निवडणूकीत मुसंडी मारत १८ पैकी ९ जागा जिंकून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जोरदार प्रवेश केला.आमदार राहुल कुल यांच्या भाजपा पुरस्कृत जनसेवा विकास पॅनल ९ जागा/ग्रामपंचायत-४,सोसायटी-४,हमाल माथाडी-१ या ९ जागेवर यश मिळविले.
दुसरीकडून माझी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या राष्ट्रीवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल ९-जागा/सोसायटी-७,व्यापारी-२ या जागेवर विजय मिळविला.
दौंड शहरातील सहकार भवन येथे सकाळी पासूनच मतमोजणीला सुरूवात झाली होती.यावेळी १८ जागेसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते.कृषीउत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हषिॅत तावरे यांनी कामकाज पाहीले.या निर्णयानंतर पुढे काय याकडे सर्वाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
या परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती कोण? यावर तर्क वितर्क लावले जात आहेत.