अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड मध्ये खाजगी रुग्णालयावरती गुन्हा दाखल डॉ. संग्राम माणिकराव डांगे (उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधीक्षक दौंड यांनी दिनांक 03/08/2020 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत डॉक्टर समीर कुलकर्णी यांचे पिरॅमिड हॉस्पिटल येथे कोविड संसर्ग अनुषंगाने तीन पेशंट एक महिला दोन पुरुष यांना औषधोपचारासाठी पाठवले असता त्या ठिकाणी पेशंट यांना उपचार कामी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न करता त्यांनी पेशंट पासून कोरोना विषाणू संसर्ग पसरणे हे माहीत असूनसुद्धा सदरचे पेशंट ऍडमिट न करता त्यावर औषध उपचार उपचार केला नाही उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्या प्रमाणे असलेले आदेश पाळलेले नाहीत त्यांचे आदेश न पाळणे व हलगर्जीपणा संसर्गजन्य रुग्णाला दवाखान्यात दाखल न केल्याने संसर्गजन्य रोग प्रसारित होण्यास मदत केली आहे.भा.द.वि.क 188,269,साथिचा रोग अधिनियम 1897 कलम 3 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 57 या प्रमाणे दि 5 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहीती पो.उपनिरिक्षक श्री.भाकरे यांनी दिली.