अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड तालुका प्रतिनिधी विजय जाधव
दि.01 ऑगस्ट रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दौंड नगरपरिषद वाचनालय चौक दौंड येथील वाचनालयास लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे तसेच याबाबत दौंड नगरपालिकेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी दोन्ही गटातील सर्व नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत हुतात्मा चौक दौंड येथील जुनी नगरपालिका येथे असलेल्या वाचनालयास लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याबाबत सर्वपक्षीय एकमताने ठराव मंजूर करण्यात यावा असे निवेदन लहुजी शक्ती सेनेने दिं.28/07/2020 रोजी दौंड नगर परिषद मुख्यधिकारी श्री.मंगेश शिंदे यांना देण्यात आले. अशी माहिती दौंड लहुजी शक्तीसेनेचे तालुका अध्यक्ष विक्रम अडागळे यांनी दिली आहे. निवेदन देताना विक्रम अडागळे (लहुजी शक्ती सेना दौंड तालुका अध्यक्ष).अक्षय मोरे,नरेश ससाणे, अमित मोरे,रितेश घोडे, शुभम गायकवाड, शुभम सोनवणे, शुभम साळवे हे उपस्थित होते.