अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-दि 8 मागील काही दिवसापासून दौंड पोलिसांनी दौंड शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करत संशयित वाहनांची कसून तपासणीची मोहीम हाती घेतली आहे.त्याचा प्रत्यक्ष इफेक्ट म्हणजे दिनांक 06 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे व त्यांचे सहकारी अधिकारी व पोलिस स्टाफ असे कल्पलता चौक दौंड येथे नाकाबंदी करीत असताना एक संशयित दुचाकी त्यावर नंबर नसलेली मिळून आलेने सदर दुचाकीवरील इसमाकडे दुचाकीचे बाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला व त्याच्याकडे सदर दुचाकीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला म्हणून त्यांनी त्याच्याकडे अधिक चौकशी करता सदरची दुचाकीचा नंबर एम एच 45 यु 0417 असा असल्याचे निष्पन्न झाले व सदरची दुचाकी ही त्याने हडपसर पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी केली असल्याची कबुली दिलेने त्याला तात्काळ दुचाकीसह ताब्यात घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात संपर्क करून खात्री केली असता हडपसर पोलीस ठाणे येथे सदर दुचाकी बाबत चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याबाबत हडपसर पोलिसांना कळवून सदरच्या संशयित नाव संशयित नाव – अमजद गफूर खान वय 19 वर्षे , रा भीमनगर दौंड ता दौंड व त्याचे ताब्यातील वाहन पुढील कार्यवाही करिता हडपसर पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार गव्हाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे,स.फौ.महेंद्र गायकवाड, पो.हवा. सुभाष राऊत,पो.हवा. सुरेश चौधरी, पो. ना. अमोल गवळी, पो.कॉ अमजद शेख, पो. कॉ. महेश घोडके, पो. कॉ. अमोल देवकाते, पो. कॉ. शेखर झाडबुके यांनी केली