अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड पोलीस ठाणे अंतर्गत आता सर्व गुन्हेगारांचे क्राइम रेकॉर्ड अद्यावत करण्यात दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले की तात्काळ तडीपार कारवाई करण्यात येते दौंड पोलीस ठाणे हद्दीतून मागील वर्षात जवळजवळ चाळीस लोकांना एक वर्षाकरता तडीपार करण्यात आलेले आहे 2020 मध्ये सुद्धा तडीपार प्रस्ताव रवाना झाले होते त्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक यांनी खालील 15 लोकांना तडीपार केलेले आहे सदर लोकांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे मारामारी,जबरी चोरी, विनयभंग ,दारूविक्री यासारखे गुन्हे दाखल आहेत ,सदर गुन्हेगार परत विनापरवाना दौंड मध्ये दिसून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, त्यानंतर याच लोकांच्या वर पुन्हा झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत किंवा संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात येईल ,यापुढे प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांचे बारीक लक्ष असेल सदर कारवाई श्री. सुनील महाडिक (पोलीस निरीक्षक),सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री.ऋषिकेश अधिकारी(सहाय्यक पोलीस निरीक्षक),श्री.भाकरे (सहाय्यक पोलीस फौजदार), श्री.बोराडे (पोलीस नाईक),वारे पोलीस शिपाई ,श्री.वलेकर (पोलीस शिपाई) ,श्री. शिंगाडे (पोलीस हवालदार), श्री.आसिफ शेख (पोलीस हवालदार),श्री.पांडुरंग थोरात (पोलीस हवालदार)श्री.हिरवे (पोलीस हवालदार), श्री.गुंजाळ,श्री. वाघ, श्री.गाढवे श्री.गवळी, श्री.अमोल देवकाते (पोलीस शिपाई) यांनी केली आहे.
तडीपार केलेल्या गुन्हेगारांचे नावे खालील प्रमाणे
तडीपार इसम
- दीपक रमेश विधाते
- पंकज दिलीप निमजे
- जॉय सतीश नवगिरे
- शाहिद मोहम्मद शेख
- राहुल चन्नाप्पा कमप्लीकर
- अजय हनुमंत चन्नूर
- लिंगाप्पा अमात्य चूनुर
- सोनू नामदेव शेटे
- मनोज अण्णाराय नरळे
- सुरज विजय होसमाने
- सागर अरुण कांबळे
- लखन जीवन सरवय्या
- सागर कैलास अल्लाट
- सुशांत राजू कांबळे
- विशाल प्रकाश काटकर
अशी माहीती श्री.सुनील महाडिक (पोलीस निरीक्षक) दौंड पोलीस स्टेशन यांनी दिली