अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड तालुका प्रतिनिधी
विजय जाधव,मयूर साळवे
दौंड मध्ये मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दौंड नगरपालिकेने कारवाई केली कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दौंड नगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून काल दि 15 जून रोजी मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना,दुकानात सेनेटाईजर न ठेवणारे बेजबाबदार दुकानदार,सोशल डिस्टनसिंग चे पालन न करणारे नागरिक अश्या सर्व मिळून 124 लोकांवर दौंड नागरपालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली शालिमार चौक,गांधी चौक,मंडई परिसर,गोपालवाडी रोड अश्या विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली सदर कारवाई मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेतील विविध अधिकारी व कर्मचारी वर्गाने मिळून केली तसेच सर्व नागरिकांना समजावून जनजागृती करण्यात आली