दौंड येथील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मध्ये कुसुम डीस्टीलेशन रिफायरिंग प्रा.ली या कंपनीमध्ये काल आगीचे तांडव बघण्यात आले,आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही

Read Time3 Minute, 11 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार दौंडमधील स्थानिक प्रशासन उपयोजनेवर काम करत असताना अनेक वेळा दौंडवर कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे व दौंड पोलीस,दौंड नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती,व अन्य स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या परीने कार्य करत असताना मध्येच कोणत्या तरी समस्येला सामोरे जावेच लागत असल्याने प्रशासनवर खूपच ताण येत आहे.असाच एक प्रकार काल दिनांक-२२/०५/२०२० रोजी दौंड येथील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मध्ये कुसुम डीस्टीलेशन रिफायरिंग प्रा.ली या कंपनीमध्ये आगीचे तांडव बघण्यात आले अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे आगीचे लोट एवढे मोठे होते की त्या आगीच्या तांडवणे स्थानिक कंपन्यांना व नागरिकांना या समस्येशी सामना करावा लागेल यासाठी बाजूच्या कंपणीमधील काही वेळापूरते कामकाज बंद करण्यात आले व घटनास्थळा पासून तीन किलोमीटर चा परिसर बंद करण्यात आला त्या आगीच्या तांडवला विजवण्यासाठी तब्बल 8 ते 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले दौंड नगरपरिषद, बारामती नगरपरिषद, जेजुरी, पुणे,व कुरकुंभ मधील कारगिल कंपनीच्या कर्मचारी वर्ग यांच्या मदतीने शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.मुख्यता बाब म्हणजे एम आय डी सी मध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या कमी असल्याचे निदर्शनास आले अजून याच्या पुढे असे अनेक अपघात झाले तर प्रशासन यावर काही उपयोजना करतील असा सवाल स्थनिक नागरिक करीत आहेत.अश्या भयानक परिस्थितीत कुरकुंभ मधील स्थनिक लोकांच्या मदतीने टँकर उपलब्ध केले.व उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा व दौंड पोलीस निरीक्षक श्री:सुनील महाडिक,उपविभागीय दंडाधिकारी श्री:प्रमोद गायकवाड,बारामती पोलिस अधीक्षक श्री:जयंत मीना, दौंड तहसीलदार श्री:संजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत तेथील जागेची पाहणी केली.व परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड शहरवासीयांसाठी दिलासादायक बातमी.
Next post Arsenic Album ३० चे आरोग्य भारती दौंड,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वितरण
error: Content is protected !!
%d bloggers like this: