अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
दौंड-दिनांक-२०/०५/२०२० रोजी दौंड शहरात एक कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने खूप मोठी खळबळ उडाली असता आज मात्र दौंड शहराला दिलासादायक बातमी मिळाली दौंड शहरातील १ पोजिटिव्ह रुग्ण आढळला व त्वरित पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १४ नागरिकांचे घशातील स्वँब पुणे येथे नेले असता आज सर्व १४ नागरिकांचे तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याची माहिती दौंड उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.बातमी सर्व दौंडकरांसाठी दिलासादायक आहे पण आजून काळजी घेण्याची गरज आहे घरीच रहा सुरक्षित रहा.

