दौंड-(पवन साळवे)कोरोना ग्रस्तांना दोन घास.
कोरोना नावाच्या विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे त्याच्या या घातक परिणामामुळे संपुर्ण भारतावर व महाराष्ट्रावर आर्थिक संकट ओढवले आहे लॉकडाऊन घोषित करून त्यातून सावरण्याचा प्रयत्न चालू आहे.तदपूर्वी लॉकडाऊन मुळे काही कामगार व काही प्रवासी आहे त्याच ठिकाणी अडकले आहेत त्यांना रहाण्याची व जेवणाची सोय सर्व सामाजिक संघटन करत आहेत त्याच हेतून संकुल महिला बचत गट,व संकुल सोसायटी, सरपंच वस्ती,यांच्यावतीने आज कोरोना संकटात सापडलेल्या दौंड रेल्वे स्टेशन परिसरातील बाहेरगावच्या गरीब लोकांना जेवण देण्यात आले .बचत गटाच्या माजी अध्यक्षा ,नगरसेविका ऍड.शितल मोरे यांच्या आवाहनाला महिलांनी प्रतिसाद दिला.यावेळी सौ.सुजाता बनकर सौ.रोहिणी सूर्यवंशी,सौ.मनीषा अभंग,सौ.योगिता गाडे,सौ.अनुजा देंडगे,सौ.आशा भोंग , सौ. अर्चना पवार,सौ.सुरेखा काकडे,सौ.दिपाली वसगडेकर,सौ.शैलजा मोटे ,सौ.सुशिला राऊत,सौ. पूजा बनसोडे,सौ. मेघा जाधव, सौ.प्रियंका जावीर या सर्व महिलांनी जेवण तयार करून दिले,व सौ.शितल मोरे यांनी स्वतः कोरोना ग्रस्तांना जेवण वाढले.यावेळी त्यांनी कोरोना ग्रस्तांच्या भावना व अडीअडचणी समजून घेतल्या.प्रा.डॉ.भीमराव मोरे,
माजी सरचिटणीस , भारतीय बौद्ध महासभा,दौंड तालुका.
संस्थापक अध्यक्ष्य,भीम महोत्सव, संविधान चौक,गोपाळवाडी रोड ,दौंड. यावेळी उपस्थित होते
Read Time2 Minute, 15 Second