Read Time1 Minute, 22 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
पवन गौतम साळवे-दौंड प्रतिनिधी
दौंड शहरात दोन खाजगी सावकरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन खाजगी सावकरांच्या विरोधात शिला ल्यूथर उड यांनी फिर्याद दिली आहे.उड या महिलेने मुलीच्या उपचारासाठी तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते.तरी ते महिन्याला तीन हजार रुपये गेली चार वर्षे ते परतफेड करीत आहेत.तरी दोन दिवसांपूर्वी या दोन्ही व्यक्तीने माझ्या घरी येऊन मला धमकावून सांगितले की तुझे आत्तापर्यंत चे सहा लाख रुपये झाले असे बोलून मारहाण व शिवीगाळ व दमदाटी करून फ्लॅट ची कागदपत्रे घेतली आहेत.एका महिला सावकारने मी माझे स्वतःचे कपडे फाडून तुझ्या मुलाच्या विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करेल अशी धमकी दिली असल्याचे उड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.अशी माहिती ठाणे अंमलदार रमेश काळे यांनी दिली