दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य दौंड पुणे यांच्या वतीने 11 एप्रिल व 12 एप्रिल रोजी उत्सव महापुरुषांच्या विचारांचा !

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले व महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 व्या जयंती निमित्ताने गरजवंत विद्यार्थी यांना शालीय साहीत्य वाटप, व सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, शिक्षण व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर यांना भीम पॅथर गौरव सन्मान चिन्ह व संविधान प्रस्तावना प्रिंट भेट देण्यात आली. यावेळी प्रख्यात व्याख्याते अॅड संभाजीराव बोरूडे सर यांनी सद्या चाललेल्या धार्मिक घडामोडी व धर्मा च्या नावावर द्वेष पसरवला जात आसून आत्ता च सावध झाले पाहिजे. OBC नी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यात घेतले पाहिजे. गुरूमुंख नारंग यांनी दौंड शहरातील गरीब विद्यार्थी यांना मदत केली पाहिजे असे सांगितले. जयंती उत्सव समिती कार्याध्यक्ष रमेश तांबे यांनी आलेल्या पाहुण्यांचे व भीम अनुयायी यांनचे स्वागत केले. यावेळी दादा जाधवराव ( NDMJ) ,श्रीगोंदा सामाजिक कार्यकर्ते माने, नरेश डाळीबे, राजू गायकवाड, लिंगाळी गावचे पोलिस पाटील निता वाघमारे, भारत सरोदे, श्रीकांत साळवे, संजय जाधव, सुनिता वंटे, कुंदा बगाडे, संदिप बोराडे, गजानन वाघमारे सर, योगीता रसाळ पत्रकार, जानी बाबा शेख पत्रकार यांच्या सह शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक व मोठ्या प्रमाणात महिला भीम अनुयायी उपस्थित होते. न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य दौंड पुणे पॅथर जयदीप बगाडे यांनी आभार मानले.