अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
दौंड शहरावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वस्वी उपाययोजना करूनही मात्र पुन्हा एकदा दौंड शहरात कोरोनाचा रुग्ण आढळला. काही दिवसांपूर्वी दौंड शहरात एका कोरोनाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली होती व सर्वच ठिकाणी आरोग्य यंत्रणा जोराने काम करत आहे,नुसते आरोग्य यंत्रणा व पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी उपाययोजना करून काही होणार नाही तर आपण स्वतः सोशल डिस्टनसिंग चे व नियमांचे पालन करावे जेणे जर सर्व यंत्रणांचा ताण कमी होईल काल दिनांक-२८/०५/२०२० रोजी दौंड शहरातील २३ नागरिकांचे घशातील द्रव पुणे येथे चाचणीसाठी घेऊन गेले असता आज दिनांक-२९/०५/२०२० रोजी मात्र २३ मधील २२ नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले व आज गोवागल्ली येथील ३२ वर्षीय इसमास कोरोणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.दौंड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ६ वर जाऊन पोहचली.अशी माहिती उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.
