Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

नगरदेवळे येथे श्रवण कुमार बहुउद्देशिय दिव्यांग विकास संस्था व महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास संघटना आयोजित मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
2 0
Read Time4 Minute, 19 Second

नगरदेवळा(प्रतिनिधी): दिव्यांग बंधू भगिनींसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून आजवर सतत मदत करीत आलो आहे.प्रसंगी मेळावे देखील घेतले आहेत. येत्या काळात दिव्यांग बांधवांची गैरसोय टाळावी एकाच ठिकाणी त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात त्यांची फरफट थांबावी या उदात्त हेतूने
जिल्हयातील दिव्यांग बांधवांचा “जिल्हा दिव्यांग मोबाईल कॅम्प” आयोजित करावा असा अभिनव उपक्रम विचाराधीन असून यासाठी मी प्रयत्नशील आहे. अशी भावना जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी आज नगरदेवळें येथे श्रवण कुमार बहुउदेशिय दिव्यांग विकास संस्था व महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास संघटना आयोजित दिव्यांग वधू वर नांव नोंदणी मेळावा तसेच जिजाऊ रत्न दिव्यांग मित्र पुरस्कार सोहळयात व्यक्त केली आहे. व्यासपिठावर पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, युवा नेते अमोल शिंदे, दिव्यांग उद्योजक मिनाक्षीताई निकम ,भारती ताई चौधरी, जिजाऊ रत्न पुरस्कार गौरवार्थी तथा अस्थीरोग तज्ञ डॉ. महेश पाटील ,डॉ. आर सी कानुजिया, अपंग महामंडळ जिल्हा व्यवस्थापक वैशाली जाधव, अपंग पुर्नवसन केंद्रांचे एस पी गणेशकर, डॉ. विजय कुरकुरे, आयोजक प्राचार्य संस्थापक अनिल पाटील, आबा चौधरी,मुख्य व्यवस्थापक बुलढाणा अर्बन सुरेश झंवर,विभागीय व्यवस्थापक रमेश पवार ,एस पी बावस्कर यांचे सह मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की दिव्यांग परिवाराच्या अडचणी सोडविणेसाठी माझ्या तालुक्यात कृतीबद्ध कार्यक्रम आयोजित करून दिव्यांग बांधवांची नोंदणी केली. त्यांना हव्या असलेल्या शासकीय लाभ मिळवुन दिले. दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी स्वयंदीप संस्थेच्या माध्यमातून मीनाक्षीताई निकम यांनी मोठे काम उभे केलेले आहे. स्वतः अस्थीरोग तज्ञ असून त्यांची सेवा गाव पातळीवर सेवेचा वसा डॉ. महेश पाटील यांनी सुरू ठेवला आहे. याप्रमाणे सर्वांनी एकत्र मिळून दिव्यांग बांधवांची अडचणी सोडविण्यासाठी एकत्र आले तर दिव्यांग बंधू ,भगिनींसह त्यांच्या परिवाराची मोठी सेवा घडणार आहे.असे ते म्हणाले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता पाटील, वर्षाताई पाटील, सुनील मालदे, गोरख पाटील, किरण पवार, आबा चौधरी, संजय मिस्तरी, संजय पाटील, भारती चौधरी, प्रतिभा पाटील, संदीप पाटील आदींनी परीश्रम घेतले.
जिजाऊ रत्न पुरस्कारार्थी
डॉ. महेश पाटील, डॉ. आर सी कानुजिया, डॉ. कुरकुरे,एस. पी . गणेशकर,एस पी बाविस्कर, भाऊसाहेब ओहोळ, पिराजी गायकवाड, सचिन मालदे, डॉ.भारत चौधरी, मिनाक्षीताई निकम, सुरेश झंवर यांचा दिव्यांग मित्र जिजाऊ रत्न पुरस्कार खासदार उन्मेश पाटील यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: