
नगरपालिका प्रशासनाचे काम मंद गतीने,शहरात जनहिताची कामे खोळंबली,नदीपात्र सफाई कधी-जनआंदोलन खान्देश विभाग
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 19 एप्रिल रोजी जनआंदोलन खान्देश विभाग तर्फे ई-मेल द्वारे नदीपत्राची सफाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले
चाळीसगांव नगरपालिकेच्या वतीने दरवर्षी एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला नालेसफाई व नदीपात्राची साफसफाई नियमितपणे केली जाते,ही साफसफाई वरच्यावर होत असली तरी ती नियमित होत होती.त्यासाठी नगरसेवकांवर नागरिकांचा दबाब असल्याने ही साफसफाई मोहिम राबविली जात होती.मात्र गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिकेत प्रशासक म्हणून मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे यांची नियुक्ती झाल्यापासून शहरवासियांच्या हिताची कोणतेही कामे होत नसल्याने संपूर्ण नगरपालिका प्रशासना विरोधात नाराजगी पसरली आहे.
प्रशासकाच्या दुर्लक्षामुळे शहरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.प्रशासकराज मध्ये कामांना गती निर्माण होईल अशी नागरिकांची अपेक्षा असतांना प्रशासक काळात नगरपालिका अधिकारी व कर्मचारी बेफिकीर झाली असून अनेक जनहिताची कामे खोळबंली आहे. नगरपालिकेत फक्त ठेकदारांची बिले काढण्यात प्रशासक मुश्गुल असल्याने साफ सफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची चर्चा देखील शहरात सुरू आहे. प्रशासक काळात झालेल्या विकासकामे देखी निकृष्ट दर्जाची होत असल्याची नागरिकांची तक्रार असून प्रशासक काळात झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी देखील नागरिकांच्यावतीने होत आहे.जिल्हयातील अनेक नगरपालिका प्रशासकांनी लोकसहभागातून नदीपात्राची साफसफाई केली.त्यांचे जिल्हाधिकार्याकडून कौतुक देखील झाले मात्र चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्यामुळे साफसफाई मोहीम राबविली जात नसल्याने पावसाळयात नदी नाले घाणीमुळे तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहराला गेल्या वर्षी महापूराचा तडाखा बसला होता होता लाखो करोडो रूपयांची वित्तहानी झाली होती.
राज्याचे जलसंपदा मंत्री ,पालकमंत्री यांच्यासह जिल्हाधिकार्यांनी नदीपात्रातील अतिक्रमण काढून साफसफाई करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाला दिले होते मात्र नगरपालिका प्रशासकाने त्यांचा आदेशाला केराची टोपली दाखविली असून अदयापही नदीपात्रातील अतिक्रमण काढले गेले नाही.त्याचप्रमाणे नदीपात्राची साफसफाई देखील झालेली नाही.त्यामुळे भविष्यात येणार्या महापूरामुळे पुन्हा जीवित व आर्थिक हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे नगरविकास मंत्री व जिल्हाधिकार्यांनी नाले साफसफाई व नदीपात्रातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणार्या प्रशासकांसह नगरपलिका अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी ही अशी विनंती ई-मेल द्वारे निवेदन देत जन आंदोलन खान्देश विभागाच्या वतीने करण्यात आली आहे,ई-मेल द्वारे दिलेल्या निवेदनात प्रा गौतम निकम,शत्रुघ्न नेतकर,विजय शर्मा,योगेश्वर राठोड,आबा गुजर बोरसे,नाशीर भाई शेख,मिलिंद अशोक भालेराव,गणेश भोई,प्रदीप चौधरी,अशोक राठोड,आर के माळी सर,सागर नागणे,संदिप पाटील आदींची नावे आहेत.
Average Rating