संपादक गफ्फार शेख (मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- नगर परिषद कर्मचारी क्रेडीट को ऑफ सोसायटी च्या चेअरमन पदी दिनेश जाधव यांची बिनविरोध निवड.
दि २५ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री कृष्णराव अहिरराव यांचे अध्यक्ष ते खाली श्री दिनेश जाधव यांची चेअरमन पदी व दिपाली देशमुख यांची व्हॉईस चेअरमण पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ही निवड बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मंगळवारी (दि.२५) रोजी कृष्णराव अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ५ वाजता संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी दिनेश जाधव यांचा तर व्हा चेअरमन पदासाठी दिपाली देशमुख यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त चेअरमन दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद कर्मचारी क्रेडीट को ऑफ सोसायटी अधिक मजबूत आणि समृद्ध बनेल अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.