संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-आज दि. 02 जुलै 2023 रोजी चाळीसगांव येथे हाजी हन्नान शेख गुलाब यांची मुलगी फरहाबानो यांचा साखरपूडा कजगांव येथील जाकीर अजीज मन्यार
यांचे कनिष्ठ चिरंजीव शेख सलमान यांचेशी निश्चित झाला होता व या वेळी मन्यार समाज बिरादरी व समाजातील प्रमुख व्यक्ती मौलाना शफीक कजगाव हाजी अशरफ, हाजी सर्फराज खान, रफिक सर, हाजी शफी उपसरपंच कजगाव,लुकमान भाई शेख यांनी पुढाकार घेत साखरपुड्यातच लग्न लावून घेण्याची विनंती केली या सर्वांचा मान राखून वधु व वर यांचे पालकानी विनंती मान्य करून साखर पुढ्यात लग्न उरकवून घेण्यात आले.या वेळी मुफ्ती अ.अलीम यावल यांनी निकाहा बद्दल बद्दल आपले विचार मांडलेत मौलाना हाफीज जमशेर यानी कुराण पठन केले हे समाजातील इतरांसाठी देखील उत्तम उदाहरण आहे . ना लग्नपत्रिका, ना मानपान लग्नकार्यातील या सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत वधू-वर पक्षाला लग्नात मोठा खर्च करता येणे शक्य असताना दोन्ही परिवार,वधू-वर यांनी मान्यवरांच्या आग्रहाचे मान ठेऊन साध्या पद्धतीने लग्न उरकून घेण्याचा प्रस्ताव मान्य केला आणि लग्नाच्या पुढील तयारी सुरू झाली त्यानंतर अवघ्या काही वेळेतच ना मानपान, ना रुसवे-फुगवे,ना हुंडा, शिवाय साधेपणाने सलमान-फराहबानो यांचा विवाह सोहळा पार पडला. साखरपुड्याला आलेले मण्यार परिवार नवरी घेऊनच कजगाव घेल्याने अनेकांना सुखद धक्का बसला.
यावेळी हाजी शफी उपसरपंच कजगाव,हाजी सर्फराज ,हाजी अ.गनीभाई,रसूल पहेलवान,इकबाल कुरेशी, हाजी इस्माईल,फिरोज सैय्यद नाशिक,नाजीम मन्यार,शफी भाई,बशीर भाई,लुकमान मण्यार,अरमान मन्यार कजगाव,हाजी इब्राहिम हवालदार,हाजी अश्रफ,रफिक भाई प्रेसवाले आदी मन्यार समाज बांधव उपस्थित होते.या निर्णयाचे मन्यार समाजबांधवांनी स्वागत केले.
यावेळी हाजी गफूर पहेलवान,अलाउद्दीन शेख, फकिरा मिर्झा, असलम मिर्झा,पत्रकार गफ्फार मलिक, अजीज खाटीकसर, मुराद पटेल आकाश धुमाळ यांनी शुभेच्छा दिल्या.