अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड: नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र ( NUJM )पुणे जिल्ह्याची दौंड तालुका कार्यकारिणी बैठक दि 8 जुलै 2020 रोजी केडगाव इथे पार पडली झाली.
युनियनच्या राज्याच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या आदेशाने,पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन चपळगावकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा कार्याध्यक्ष रायचंद शिंदे अध्यक्षतेखाली वार्षिक सभा संपन्न झाली व नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.यावेळी शिरुर तालुका अध्यक्ष सचिन धुमाळ,समन्वयक प्रमोल कुसेकर उपस्थित होते
दौंड तालुका अध्यक्षपदी सचिन रुपणवर (डी.न्यूज वृत्तवाहिनी ),
उपाध्यक्षपदी संजय सोनवणे (सी २४ तास ),
कार्याध्यक्षपदी विठ्ठल होले (महाराष्ट्र भुमी न्यूज पोर्टल ),
सचिव पदी सुशांत जगताप (N टिव्ही),चिटणीस पदी बाळासाहेब मुळीक (दै .प्रभात) खजिनदारपदी सचिन आटोळे (दौंड टाईम्स ),
समन्वयक पदी दिपक पवार( डी.न्यूज वृत्तवाहिनी ) आणि कायदे सल्लागार पदी ॲड.सचिन रणसिंग ( अधिकार आमचा न्यूज पोर्टल )
यांची निवड करण्यात आली.
युनियनचे सदस्य पुढीलप्रमाणे हरिभाऊ बळी ( गाव माझा न्यूज),राणी सोनवणे (RN न्यूज),नंदकुमार पवार (डी न्यूज वृत्तवाहिनी),पवन साळवे (झुम आॕन न्यूज),राजेंद्र जामकर , ( महाराष्ट्र भुमी न्यूज), मयूर साळवे ( अधिकार आमचा न्युज पोर्टल),विजय जाधव ( अधिकार आमचा न्यूज पोर्टल .)
राज्याच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन रुपणवर,कार्याध्यक्ष .विठ्ठल होले
यांच्या सह सर्वाचे या मिटींगनंतर अभिनंदन केले आणि हे पद ही मोठी जबाबदारी असून आपण सर्व उत्तम काम कराल असा विश्वास व्यक्त केला व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले दरम्यान कोरोना काळात झालेल्या बैठकीत सोशल डिस्टनसिंग पाळत, मास्क व सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला.