न चुकता वीज बिल भरले तरी भावाचे थकीत बिल भरा म्हणत सहा अभियंता यांनी केला वीज पुरवठा खंडित,कुटुंब १० दिवसांपासून अंधारात

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि १८ फेब्रुवारी रोजी १२ ते १५ वर्षांपूर्वी गाव सोडून गेलेल्या भावा कडे मीटर बिल थकबाकी आहे म्हणून न चुकता बिल भरणाऱ्या भावाचा विद्युत पुरवठा सहा अभियंता चव्हाण यांच्या कडून खंडित करण्यात आला आहे.शहरात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चे काही अधिकारी सामान्य वीज ग्राहकांना नाहक त्रास देण्याचे कार्य करत असल्याचे दिसत आहे मागील काही दिवसांपासून पि. डी केलेल्या वीज मीटर ग्राहकांकडून वसुली मोहीम सुरू आहे, मात्र यात त्यांच्या नातेवाईकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.
या बाबत संपूर्ण वृत्त असे की शहरातील पंचशील नगर येथील रहिवासी नितीन दामोदर पवार हे २०१९ पासून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चे वीज उपभोगता आहे व न चुकता वीज बिल भरतात मात्र १२ ते १५ वर्षांपूर्वी त्यांचे बंधू हे गाव सोडून कामानिमित्त बाहेर गावी राहतात व त्यांचे घर पडक्या अवस्थेत आहे. नितीन पवार हे स्वतःच्या मालकीच्या घरात त्या पडक्या घराच्या शेजारी आपल्या कुटुंबासोबत वेगळे राहतात मात्र त्यांच्या तुमच्या भावाकडे वीज बिल थकबाकी आहे म्हणून पवार यांचा विज पुरवठा कोणत्याही प्रकारची नोटीस व पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आला.विशेष हा वीज पुरवठा खंडित करणारे सहा अभियंता यांनीच हे मीटर २०१९ साली दिले आहे.जर थकबाकी होती तर त्या वेळी मीटर का दिले असा प्रश्न उपस्थित राहतो व आज जवळ जवळ परिवार मोठा झाला की परिवाराचे सदस्य विभक्त होतात म एका ची जबाबदारी सहा अभियंता चव्हाण दुसऱ्यावर का टाकत आहेत.पडक्या घराचे फोटो घेऊन नितीन पवार हे चव्हाण यांना दाखविण्यासाठी गेले असता चव्हाण यांनी पवार यांना दम भरला पैसे भर नाहीतर तुझ्यावर खोट्या केसेस करतो, तुला जेल मध्ये टाकतो या बाबत दि २० फेब्रुवारी रोजी सहा कार्यकारी अभियंता राऊत यांना लेखी तक्रार दिली असता राऊत यांनी चव्हाण यांना समज देणे गरजेचे असतांना उलट पवार यांना शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर माफीनामा लिहून द्या मी वीज पुरवठा जोडण्यासाठी सांगतो असे सांगितले यावरून लक्षात येते की वरिष्ठ अधिकारी देखील चव्हाण यांना पाठीशी घालत आहे यामुळे पवार व त्यांचा परिवार यांना मानसिक त्रास होत असून १० दिवसापासून कुटुंब अंधारात आहे मच्छर चावल्याने परिवाराचे अनेक सदस्य आजारी आहेत यामुळे दि १ मार्च रोजी पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा अन्यथा परिवारासोबत आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे मा मुख्यमंत्री,ऊर्जामंत्री यांच्या सह महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या वरिष्ठांना दिला आहे.