परिवर्तन पॅनल ने वाचला राष्ट्रीय सहकारी शिक्षण मंडळाच्या संचालकांमुळे संस्थेला आलेल्या अधोगतीचा पाढा…

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
परिवर्तन पॅनल मक्तेदारी संपुष्टात आणून सामान्य सभासदांना न्याय देत कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य उमेदवारास शिक्षण भरतीत संधी देणार ग्रामीण भागात वसतीगृह उभारणार शिक्षणाचा दर्जा सुधारत इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करणार अश्या अनेक शैक्षणिक विषयांना अनुसरून कार्य करणार असल्याचे परिवर्तन पॅनल च्या वतीने सांगण्यात आले आहे.
चाळीसगाव(प्रतिनिधी)- रामभाऊ जिभाऊ,मोतीलाल भाऊ, राजाराम भाऊ यासारख्या मान्यवरांनी बहुजनांसाठी राष्ट्रीय सहकारी शिक्षण मंडळाची स्थापना केली यात य ना चव्हाण यांनी देखील हात भार लावत लोकसहभागातून चाळीसगाव तालुक्यात शिक्षण संस्थे शिक्षण क्षेत्रात क्रांती आणणारी संस्था उदयास आणली मात्र मागील काही वर्षांमध्ये संस्थेचा दर्जा खालावला आहे,विकास पॅनल हे विका पॅनल म्हणून आपले कार्य करत आहे अशी जोरदार टीका सकाळी 11 वाजता मॉर्डन बँकेच्या आवारात घेतलेल्या पत्रकार परिषदेत परिवर्तन पॅनल चे डॉ नरेश देशमुख,अशोक खलाने व रोहिदास पाटील यांनी केली.
सद्या जे संचालक मंडळ आहे यांनी आपल्या कार्यकाळात संस्थेचा शिक्षणाचा दर्जा खालवत फक्त स्वार्थासाठी कार्य सुरू केले आहे,ग्रामीण भागात संस्थेच्या अनेक शाखा आहेत मात्र त्या शाखांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे वर्गात फळे नाही,साधने नाहीत संचालकांनी कधी याकडे लक्ष दिले नाही,याकारणाने ग्रामीण भागाच्या पालक वर्गाचा विश्वास संस्थेच्या ग्रामीण भागातील शाखांवर राहिलेला नाही याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात चाळीसगाव शहरात शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात तसेच ग्रामीण भागातील शाखांमध्ये संचालकांनी कधी भेटी दिल्यात का? बैठकींचे आयोजन केले का? ज्या बैठकी ग्रामीण भागाच्या शाखांमध्ये व्हायला हव्या होत्या त्या शहरातील कार्यालयात घेण्याचा हेतू काय? या संस्थेला नवलौकिक मिळवून देत एक विशेष स्थान शिक्षण क्षेत्रात प्राप्त होते. विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत जाणारी होती मात्र हे चित्र उलट झालेले दिसत आहे,दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे यावर्षी तर अक्षरशः संस्थेवरती अशी वेळ आली की विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी कळविण्याचा बोर्ड लावावा लागला ग्रामीण भागात शालेय कमिट्या नाहीत अंधशाळेतील शिक्षकांचे पगार नाहीत,मनमानी कारभार करत शिक्षण भरती केली या संस्थेतील मक्तेदारी संपवण्यासाठी जागृत सभासदांनी जागृतपणे मतदान करण्याचे गरज असून चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेत राजकारण आले आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी परिवर्तन पॅनल ची स्थापना झाली आहे असे सांगत परिवर्तन पॅनल च्या उमेदवारांनी संस्था चालकांच्या उणिवांचा पाढाच वाचला परिवर्तन पॅनल चे उमेदवार जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी देखील फोन वर पत्रकार बांधवांशी संपर्क साधून मक्तेदारी संपुष्टात आणणार असून संस्थेचा कारभार पारदर्शक करणार असल्याचे सांगितले.
या पत्रकार परिषदेत डॉ . नरेश देशमुख , अशोक खलाणे , रोहीदास पाटील यांच्यासह उमेदवार प्रशांत देशमुख , एकनाथ खलाणे , भगतसिंग पवार , भिमराव पवार , पंडीतराव पवार , चित्रा देशमुख , सुलोचना सुर्यवंशी , अप्पा चौधरी , किशोर सोनवणे उपस्थित होते .