अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
निर्भय व जयेश सोनार यांनी जिंकली परिवर्तन युवा वक्ता मानाची ढाल ..!
पुणे / अमळनेर -महाराष्ट्रातील अत्यंत मानाची ‛परिवर्तन युवा वक्ता 2021’ राज्यस्तरीय युवा वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचे विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार व जयेश संजय सोनार यांनी सांघिक सर्वोत्कृष्ट विजेतेपद पटकावले . वैयक्तिक गटात जयेश संजय सोनार याने द्वितीय क्रमांक पटकावला!
पुणे येथील पत्रकार भवनात पार पडलेल्या बहारदार कार्यक्रमात राज्यातील ८० स्पर्धक सहभागी झाले होते!
प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते निर्भय सोनार व जयेश सोनार यांस मानाची ढाल , सात हजार रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी इंद्रजित देशमुख, डॉ प्रतापसिंह साळुंके, ऍड शिवकुमार गिरवलकर, प्रा योगेश बोराटे मंचावर उपस्थित होते!
नासिक येथील श्रुती बोरस्ते प्रथम , अमळनेर येथील जयेश सोनार द्वितीय तर कोल्हापूर येथील अक्षय इळके याने तृतीय क्रमांक पटकावला!
प्राचार्य पी आर शिरोडे, प्रा नितीन पाटील, प्रा डॉ रमेश माने, डिगंबर महाले, ऍड.सारांश सोनार, प्रा डॉ संदीप नेरकर, प्रा डॉ लीलाधर पाटील, प्रा पराग पाटील, सतीश देशमुख, डॉ जी एम पाटील, सचिन खंडारे, कमलेश महाले, रवींद्र विसपुते, श्याम सोनार, विशाल विसपुते, सुमित विसपुते, संदीप घोरपडे, प्रा अशोक पवार, सुवर्णकार समाज व पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, मा आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, ऍड ललिता पाटील , डॉ. रवींद्र चौधरी यांनी विशेष कौतुक केले!
निर्भय व जयेश यांना adv. सारांश धनंजय सोनार यांचे मार्गदर्शन लाभले..