अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चिंचवड प्रतिनिधी सनी घावरी
दिनांक ०१/०८/२०२० रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडून बकरी ईदचे अनुशंगाने मा. पोलीस
आयुक्त श्री संदीप बिष्णोई साहेब यांचे आदेशाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकींगची व्यापक मोहीम
राबविण्यात येत असुन पोलीस दिपक खरात यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकरवी बातमी मिळाली
कि, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार १) सोमनाथ भारत शिंदे वय २६ वर्षे, धंदा- ड्रायव्हर रा. जय
बजरंग हौसिंग सोसायटी अजंठानगर, चिंचवड २) मंगेश सुनिल
झुंबरे वय २८ वर्षे, धंदा- व्यापार रा. आयव्ही इस्टेट, आयव्ही विलास सी/१४ केसनंद फाटा वाघोली
हे थरमॅक्स चौक येथे दुचाकीवर घातक अग्निशस्त्रासह येणार असल्याची बातमी मिळालेने वरीष्ठ
पोलीस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड यांना बातमीचा आशय कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर
ठिकाणी पोलीस उप निरीक्षक एस डी निलपत्रेवार, पोलीस हवालदार दिपक खरात, प्रमोद
वेताळ, केराप्पा माने, वसंत खोमणे, पोकॉ , नामदेव राऊत, , अजित सानप
यांनी सापळा रचून आरोपी सोमनाथ भारत शिंदे वय २६ वर्षे, धंदा- ड्रायव्हर रा. जय बजरंग
हौसिंग सोसायटी अजंठानगर, चिंचवड, मंगेश सुनिल झुंबरे वय २८
वर्षे, धंदा- व्यापार रा. आयव्ही इस्टेट, आयव्ही विलास सी/१४ केसनंद फाटा वाघोली त्यास
दुचाकीसह शिताफीने अटक केली त्याची अंगझडती घेवून त्याचे जवळील दोन देशी बनावटीचे
पिस्टल व चार जिवंत काडतुस मिळुन आले. आरोपी १) सोमनाथ भारत शिंदे वय २६ वर्षे, धंदा-
ड्रायव्हर रा. जय बजरंग हौसिंग सोसायटी बिल्डींग अजंठानगर, चिंचवड
२) मंगेश सुनिल झुंबरे वय २८ वर्षे, धंदा- व्यापार रा. आयव्ही इस्टेट, आयव्ही विलास सी/१४
केसनंद फाटा वाघोली यास अटक करुन त्याचे विरुध्द निगडी पोलीस ठाणेकडे भारतीय शस्त्र
अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३)
सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप
निरीक्षक एस डी निलपत्रेवार हे करीत आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस
आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस
आयुक्त गुन्हे १ श्री आर आर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट २ चे प्रभारी वरीष्ठ
पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक संयज निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी
पोहवा. दिपक खरात, शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, वसंत खोमणे, मपोहवा उषा
दळे, नामदेव राऊत, जयवंत राऊत,दिलीप चौधरी, विपुल जाधव, चेतन मुंढे, तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र शेटे व पोलीस नाईक नागेश माळी यांचे पथकाने कारवाई केली
आहे.