अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी हर्षल पाटोळे,विजय जाधव दौंड

प्रतिपंढरपूर असलेल्या व धम्म ऋषीने पावन झालेल्या व भीमा नदी तिरी असलेल्या दौंड मधील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आज आषाढी एकादशीनिमित्त कोरोणाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टन्स ठेवून आज पहाटे चार वाजून 15 मिनिटांनी पवमान अभिषेक करण्यात आला. आषाढी एकादशी चा अभिषेक ग्राम पुरोहित अतुल रामकृष्ण गटने यांनी केला अशी माहिती प्रतिक गटने यांनी दिली. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त दौंड मधील विठ्ठल रुक्माई मंदिरात दौंड शहरातील विविध ग्रामीण भागातून पालखी येत असतात आषाढी एकादशी मध्ये येणाऱ्या पालखीत साधारण दहा ते पंधरा हजार भाविक भक्तांचा सहभाग झालेले असतो. यामध्ये दौंड मधील विविध शाळेच्या सुद्धा पालख्यांचा समावेश असतो यामध्ये लहान लहान वारकऱ्यांचा सुद्धा तितक्याच उत्साहाने आनंद लुटत असतात व शाळेतून व ग्रामीण भागातून येणाऱ्या पालख्याना दौंड शहरामध्ये विविध ठिकाणी विविध संघटनेमार्फत ,पक्षांमार्फत कोणताही भेदभाव न करता सर्वांना फराळ वाटप करून स्वागत करण्यात येते. व गेली पाच वर्ष दौंड शहरांमध्ये दौंड तालुका मंडप असोसिएशन चालक-मालक यांच्यामार्फत शिवाजी महाराज चौकात भव्य असा मंडप टाकून आलेल्या ग्रामीण भागातून पालख्यांचे स्वागत करून त्यांना फराळ वाटप करण्यात येते. व लहान मुलांचाही पालखीचे फराळ देऊन स्वागत करण्यात येते अशा पद्धतीने भीमा नदीकाठी व प्रति पंढरपूर असलेल्या दौंड शहरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये दर्शन घेतले जातो, परंतु कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अगदी साध्या पद्धतीने अभिषेक करण्यात आला व त्याचबरोबर दौंड पोलीस स्टेशन दौंड मार्फत हवालदार बापू रोटे, किरण राऊत व महिला पोलीस मोकळे मॅडम यांनी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी मंदिराबाहेर चोख बंदोबस्त करण्यात आला होता