अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) :प्रभाग क्र.4, दुर्गा माता मंदिर, शास्त्रीनगर येथे झालेल्या जाहीर सभेत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व आमदार मंगेश चव्हाण यांनी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना थेट आव्हान देत आपली विकासासाठी असणारी ठाम भूमिका स्पष्ट केली.

यावेळी खासदार स्मिताताई वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शहराध्यक्ष नितीन पाटील, निवडणूक प्रभारी प्रा. सुनील निकम सर, माजी नगरसेवक पंडित अण्णा चौधरी, प्रदीप देसले, आर के चौधरी, मार्केट उपसभापती शैलेंद्र पाटील सर, शरद अण्णा मोराणकर, अशोक काका बागड, कपिल पाटील, संगीताताई गवळी, पवार गुरुजी, एकनाथ अण्णा चौधरी, अविनाश नाना चौधरी, हिरामण चौधरी, सोमनाथ आबा, आर सी आबा पाटील, डॉ.महेंद्र राठोड, सुरेश कुमावत, दिलीप कापडणे, वनेश खैरनार, संदेश येवले, भावेश कोठावदे, हर्षल चौधरी, मोहिनी ताई गायकवाड, मोनिकाताई गांगुर्डे, पूजाताई लड्डे, विजयाताई पवार, भगवान आबा राजपूत, बबन पवार, बापू अहिरे, छोटू चौधरी, अनिल ठाकरे, नानाभाऊ, सीसी वाणी सर, रवी आबा पाटील, प्रशांत बापू पाटील, धर्मा आबा वाघ, राजु राठोड, विजय जाधव, पप्पू वाणी, डॉ. वसंतराव सूर्यवंशी, सुनील जमादार, संभाआप्पा जाधव आदी उपस्थित होते.
सभा संबोधित करताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले,आमदार मंगेश चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ असून“मुख्यमंत्र्यांनी आम्ही मंत्र्यांना विविध विकास कामांसाठी असलेल्या प्रस्तावाची पत्रे तयार करून मंजुरी मिळविण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे देण्यास सांगितले.त्यांच्या जवळ ‘कलाकारी’असून ते सर्व कामे करून आणतात कारण त्यांना प्रत्येक विभागाचा सखोल अभ्यास आहे. मतदारसंघासाठी सतत फिरून विकासासाठी काम करणारा आमदार तुम्हाला मिळाला आहे, हे तुमचे भाग्य आहे. माझ्या चौथ्या टर्ममध्ये सुद्धा मला जे जमले नाही, ते आमदार चव्हाण यांनी करून दाखवले.”
पुढे बोलताना सावकारे यांनी स्पष्ट केले की,
“प्रशासक असताना आमदार चव्हाण यांनी जवळपास 3 हजार कोटींची कामे चाळीसगावकरांसाठी आणली. परंतु पुढील काळात विकासाची गती वाढवायची असेल तर नगरपालिकेची सत्ता त्यांच्या हातात असणे गरजेचे आहे, अन्यथा अनेक विकासकामांना गती मिळणार नाही.”
विरोधकांचे लक्ष विकासाकडे करत टीकास्त्र सोडताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले,
“विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर कार्यशाळा घ्यावी.काही प्रश्न असतील तर उत्तर देण्यासाठी मी तयार आहे.विरोधकांनी मागील निवडणुकांमध्ये 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिलेली आश्वासने कुठे गेली? एकही काम त्यांना पूर्ण करता आले नाही. शहराला बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी विकासकामांची ब्लूप्रिंट जनतेसमोर ठेवावी. वार्डाची जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारणाऱ्या उमेदवाराला खुलेआम पाठिंबा देऊ.” असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पुढे बोलताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले,
“लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघासाठी काम करणे हे त्याचे कर्तव्यच असते.विकास थांबू नये, ही आमची भूमिका आहे. चाळीसगाव शहराला सुस्थितीत आणून विकासाच्या उंचीवर नेण्याचा संकल्प आम्ही केला आहे आणि तो पूर्ण करू.”
या सभेस मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.परिसरातील नागरिकांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या सह इतर मान्यवरांचा सत्कार करत या सभेला नागरिकांनी उत्साहाने प्रतिसाद दिला असून प्रभाग क्र.4 मधील या सभेमुळे नुसते आरोप प्रत्यारोपावर नाहीतर तर शहराच्या विकासाच्या मुद्यावर बोलावे लागणार असून यामुळे विकासाच्या व्हिजनवर निवडणुकीची रंगत रंगणार असल्याचे दिसत आहे.
