Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

प्राथमिक शिक्षकांचा शिक्षक ते आमदार प्रवास करणारा दमदार नेता हरपला.

0
2 0
Read Time18 Minute, 38 Second

एरंडोल(प्रतिनिधी):शिक्षक चळवळीचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ते शिक्षक संघाचे अध्यक्ष, नेते, शिक्षक आमदार पर्यंत मजल मारणारे कष्टाळू व शिक्षकांचे मन जिंकणारे माजीआमदार शिवाजीराव पाटील यांचे काल दुःखद निधन झाले त्यांच्या जीवनाविषयी लिहित आहेत शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर.

अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे नेते विधान परिषदेचे माजी आमदार शिवाजीराव दत्तात्रय पाटील वय वर्ष नव्वद यांची रविवार दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या राज्यव्यापी चळवळीत त्यांची उणीव कायम भासेल. राज्यभरातील शिक्षकांमध्ये अण्णा या नावाने परिचित असलेले शिवाजीराव पाटील प्राथमिक शिक्षकांचे वयाच्या नव्वदीतही दमदार नेते होते हे विशेष.
महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी प्रदीर्घ काळ तळमळीने काम केले सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ पासून ते अखिल भारतीय शिक्षक संघाचे नेतृत्व करेपर्यंत चा त्यांचा प्रवास सर्वांना प्रेरणादायी आहे राज्यातील तमाम प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रश्‍नांवर त्यांनी सातत्याने मोठा लढा उभारला होता .सांगली जिल्ह्यातील येलूर येथे शेतकरी कुटुंबात ३० एप्रिल १९३० रोजी शिवाजीराव पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण पी एस सी सातवी होती १३ ऑक्टोबर १९४८ रोजी चिमणगाव तालुका कोरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांची प्रथम नेमणूक झाली .शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे बाहेरून बहिस्थ विद्यार्थी म्हणून एसएससी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांना शिक्षक संघटनेत काम करण्याची आवड होती. सन १९६६ ला सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेवर संचालक म्हणून त्यांची निवड झाली.पुढे १९६७ ला याच बँकेचे ते पहिल्यांदा चेअरमन देखील झाले. १९६६ ते१९६९ हा त्यांचा शिक्षक बँक सांगली चा कार्यकाळ सदैव स्मरणात राहणारा ठरला पुढे त्यांनी १९६९ मध्ये जिल्हा शिक्षक संघ धुरा आपल्याकडे घेतली व जिल्हाध्यक्ष झाले आणि त्यांच्या राज्यव्यापी नेतृत्वाची घोडदौड सूरु केली. सन १९७५ मध्ये सांगली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या हीरक महोत्सवी अधिवेशनात त्यांची राज्य संघाचे अध्यक्ष म्हणून निवड जाहीर झाली आणि तमाम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना एक रायगड काटक भारदस्त शरीरयष्टी असलेले अभ्यासू व तळमळीने नेतृत्व पाहायला मिळाल. १९७९ मध्ये फिलीपाईन्स येथे झालेल्या जागतिक शिक्षक परिषदेत प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून हजर राहण्याचा सन्मान त्यांना मिळाला होता सन १९७५ ते १९९४ या कालखंडामध्ये संघाचे राज्याध्यक्ष म्हणून नेत्रदीपक कामगिरी त्यांनी केली. सन १९९४ चा रत्नागिरी येथील अधिवेशनात शिक्षक संघाचे नेते म्हणून त्यांची झालेली निवड यथायोग्य होती . अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतून जात सायकलवर फिरत त्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संघटनेची बांधणी केली . आपल्या संघटन शक्तीच्या जोरावर व्यक्तिगत गुणांमुळे शासनापुढे मागण्या रेटून शिक्षक हितसाठीच या मागण्या मान्य करून घेणारे माजी आमदार शिवाजीराव पाटील शिक्षकांचे दमदार नेते होते. केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता देणे, शिक्षण सेवक पदाचा कार्यकाल कमी करणे , सातवा वेतन आयोग मंजूर करणे, घरभाडे भत्ता अशा शेकडो गोष्टी व मागण्या सांगता येतील शिक्षकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त करून सतत पुढाकार घेणे आदी बाबतीत अण्णांनी यश मिळवले मंत्रालयात त्यांच्या व माझ्या झालेल्या भेटीत मला त्यांच्यातील भावी स्वप्न त्यांच्याच शब्दात त्यांच्याच चर्चेतून जाणवले.सन १९९४ ते आजअखेर मृत्यूच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते १५ डिसेंबर २०१९पर्यंत संघाचे नेते म्हणून एक गतिमान नेतृत्व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिले. १९७५ पुणे येथे १९७८ सोलापूर येथे १९८९ पुन्हा पुणे येथे १९९४ रत्नागिरी येथे २००० सली नागपूर येथे २००२ बेंगलोर येथे त्यानंतर मागील वर्षापर्यंत त्यांनी शिक्षक संघाची यशस्वी राज्यव्यापी अधिवेशन घेऊन त्यांनी आपल्या नेतृत्वाची इच्छा संपूर्ण शिक्षक मनाच्या हृदयावर उमटवली.१० फेब्रुवारी २००२ रोजी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जनरल कौन्सिल मध्ये महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली व राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास त्यांनी प्रारंभ केला २२ एप्रिल २००२ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर ती प्रचंड मताधिक्क्याने सदस्य म्हणून त्यांची निवड झाली व एक प्राथमिक शिक्षक ते आमदार शिक्षक संघाच्या ८० वर्षाच्या कालखंडाला एक मोठी उंची त्यांच्या निवडीमुळे लाभली. शिक्षक नेते शिक्षकांचे पंचप्राण माजी आमदार अण्णा शिवाजीराव दत्तात्रय पाटील केवळ सांगली जिल्ह्या पुरते मर्यादित राहिले नाही तर राज्यपातळीवर शिक्षकांच्या वाडी-वस्ती तांड्यावरील शिक्षकांच्या ओठावरील एक शिक्षक चळवळीचे अग्रणी नाव बनले. मागील वर्षी घेतलेल्या राज्य संघाच्या अधिवेशनाच्या रजांचा प्रश्न त्यांच्या मोठ्या जिव्हारी लागला होता. त्या जोडीने संघाचा अंतर्गत कलह आहे त्यांना खूप त्रासदायक ठरत होता. अधिवेशन रजा या प्रश्नासाठी मंत्रालयात त्यांनी तब्बल बारा वेळेस आदरणीय राजारामजी वरुटे केशवराव सहकाऱ्यांसमवेत फेऱ्या मारल्या तेराव्या वेळेस त्यांची आणि माझी मागील चार महिन्यापूर्वी मंत्रालयात तत्कालीन महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या दालनात भेट झाली त्या वेळेस जे जे करता येईल तेथे करण्यात आम्ही यशस्वी झालो. शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचा राज्य समन्वयक या नात्याने मला प्रामाणिकपणे त्यांचा सार्थ अभिमान नेहमीच वाटायचा ते शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे माजी सल्लागार देखील होते. येलूर येथीलच शाळेत १९८८ झाली शिवाजीराव अण्णा सेवानिवृत्त झाले.राज्य समन्वय समितीच्या वतीने त्यांचा मोठा गौरव करण्याचे राज्याध्यक्ष आदरणीय आमचे नेते अर्जुनराव साळवे साहेब यांनी चर्चेत निश्चित देखील केले होते. या सोहळ्याचे लवकरच आयोजनकरण्यात आले होते. परंतु तत्पूर्वीच आदरणीय अण्णांनी आपला निरोप घेतला. अण्णा शतकवीर होतील असे मला नेहमीच वाटत होते. कारण त्यांची शरीरयष्टी खूपच काटक होती ते कायम आमच्या सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना व शिक्षक सर्वांनाच सर्व शिक्षकांना प्रेरणादायी राहतील. त्यांच्या नावाने शिक्षण क्षेत्रात खूप काही व्हावे अशी त्यांच्या जवळ कायम भावना व्यक्त करत होतो. आदरणीय संघाचे राज्याध्यक्ष माझे मित्र राजाराम दादा वरुटे यांच्या समवेत त्यांना मी संघाच्या अधिवेशनाच्या संदर्भात रजांच्या संदर्भात मंत्रालय केलेली मदत माझ्या कायम स्मरणात राहील. आपण स्वतः मोठे केलेले काही शिक्षक जवळचे लोक आपल्याला सोडून गेले तेच कायम दुःख आहे असे अण्णा मला त्यादिवशी जाणीवपूर्वक म्हणत होते.वयाच्या नव्वदीतही मागील सहा महिन्यापूर्वी अण्णा आमच्याशी तासंतास गप्पा करत बसले .मंत्रालयात त्यांनी माझ्या स्वर्गीय वडिलांविषयी च्या व त्यांच्या शिक्षण विषयाच्या कार्याविषयी मला भरपूर माहिती दिली व वडिलांच्या निधनानंतर तुम्ही त्यांच्या नावाने कुंझर गावाच्या जिल्हा परिषद शाळेला बांधलेल प्रवेशद्वार राज्यात नव्हे तर देशात प्रेरणादायी असल्याचे त्यांनी मला स्पष्टपणे म्हटले.शिक्षक नेते हणमंतराव पवार यांच्याविषयी देखील त्यांनी माझ्याशी विचारपूस केली. तेव्हा आप्पा होते. यावेळी वेगवेगळे अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले ही आमच्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यावेळी माझ्यासमवेत नेते अर्जुनराव साळवे , संघाचे राज्याध्यक्ष आमचे मित्र राजाराम वरुटे ,अरुण जाधव, गिरीश वाणी शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मला ते नेहमी म्हणायचे २००० सालापासून किशोर पाटील कुंझरकर तुम्ही गावाच्या नावाविषयी आपुलकी जोपासतात तसेच शिक्षकी पेशाच्या अस्तित्वासाठी देखील कायम स्वतःला विसरून धडपड करत असतात शिक्षक स्वतःला झोकून देऊन काम करतो हे तुझ्याकडे पाहून मला आनंदित करत तुझं भविष्य उज्वल आहे. आदरणीय माजी आमदार प्राथमिक शिक्षकांचे पंचप्राण शिवाजीराव अण्णा पाटील हे शिक्षक चळवळीचे एक वादळच होते. अण्णा इथून पुढे शिक्षक संघाच्या व्यासपीठावर किंवा मंत्रालयात तुम्ही आमच्यासारख्या शिक्षक चळवळीतील कार्यकर्त्यांना दिसणार नाहीत. आपली आणि आमची नुकतीच कुठे सुर जुळत होती आणि तुम्ही आम्हाला सोडून गेलात. शिक्षक चळवळीच्या ऐतिहासिक उज्ज्वल कामगिरीचा विचार ज्या वेळी पुढे येईल त्या त्या वेळी अण्णा तुमचे नाव इतिहासात कोणीच विसरू शकणार नाही. मोर्चे ,आंदोलने महामंडळ सभा अधिवेशन प्रत्येक ठिकाणी तुम्ही आपलं नेतृत्वकौशल्य सिद्ध केलं.शिक्षक संघाचे अंतर्गत कलह यात देखील शिवाजीराव पाटील यांनी स्वतःला संपूर्णपणे सावरून घेतलं आणि लढायचं कसं हे शिक्षक पदाधिकाऱ्यांना एक प्रकारे शिकवून गेलात. मी २००५ पासून पासूनच वेगळ्या संघटनेत जरी होतो तरी शिक्षक नेते शिवाजीराव आन्ना पाटील, आदरणीय संभाजीराव थोरात साहेब ,आदरणीय हनुमंतराव पवार, आदरणीय राजारामवरुटे जी, केंद्रप्रमुख संघाचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे जी, गटाचे दत्ताजी नाईक,सुरेश नाना भावसार आदि सोबत माझा कायम राज्यस्तरीय प्रश्नांच्या संदर्भात संवाद व्हायचा होतो व होत राहील. या साखळीतील हे सर्व जेष्ठ शिक्षक चळवळीतील नवीन काही करू पाहणाऱ्यांसाठी विद्यापीठच आहेत. शिक्षक संघटनांचा राज्य समन्वय समितीचा राज्य समन्वयक म्हणून आतातर सर्व शिक्षक संघटनांच्या ३८ राज्याध्यक्ष सोबत आमचा संवाद होतो मंत्रालय पातळीवर अनेक शिक्षकांची प्रश्न प्रलंबित आहेत . महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून ही प्रश्न सोडावी.आता हिवाळी अधिवेशनाला देखील प्रारंभ होत आहे विधानपरिषदेवर प्राथमिक शिक्षकांमधून आदरणीय शिवाजीराव पाटला नंतर एकही आमदार घेण्यात आलेले नाही .राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची व शिक्षकांची संख्या खूप मोठी आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेतले जावे जेणेकरून प्राथमिक शिक्षकांची प्रश्न अभ्यासू पद्धतीने त्या ठिकाणी मांडले जातील व सुटतील. शिक्षक आमदाराच्या मतदान प्रक्रियात देखील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना सरसकट सहभागी होता यावे. शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्ती द्यावी .जुनी पेन्शन योजना असेल अनेक प्रलंबित प्रश्न निकाली काढावी.तसेच जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शिक्षकांना त्याच्या सेवा कशा कायम राहतील यासंदर्भात ची धोरण शासनाने आखावे.याकडे माय-बाप शासनाने लक्ष वेधावे .आजपासून हिवाळी अधिवेशन देखील नागपूर येथे नवीन सरकारच्या कार्यकाळातील पहिले अधिवेशन या नात्याने सुरू झालेले या दिवसात शिक्षक चळवळी चा आवाज बुलंद करणारे निर्णय अपेक्षित आहे.हीच खरी माजी आमदार शिवाजीराव पाटील यांना श्रद्धांजली ठरेल. येलुरी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे काल १५ डिसेंबर २०१९ रोजी त्यांचा अंत्यविधी झाला पश्चात तीन मुले मुलगी सुना नातवंडे असा परिवार व संबंध राज्यातील सर्व शिक्षक परिवार आहे. दिनांक १७ डिसेंबर २०१९ मंगळवार रोजी रक्षा विधी कार्यक्रम आहे. शिक्षक नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील यांना शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीच्या वतीने विनम्र अभिवादन.
लेखन
किशोर पाटील कुंझरकर.
राज्य समन्वयक राज्य समन्वय समिती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य.
राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ.
७०३०८८७१९०.
५३ अ क्षितिज निवास आदर्श नगर एरंडोल तालुका एरंडोल जिल्हा जळगाव. पिन ४२५१०९.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: