प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे यांची चौकशी करून निलंबन करण्यात यावे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे लेखी मागणी .

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
पुणे(वृत्तसेवा)-सोलंकी प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण पुणे यांची चौकशी करून निलंबन करण्यात यावे तसेच त्यांच्या मालमत्तेचेही गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी राज्याचे समाज कल्याण आयुक्त मा .ओम प्रकाश बकोरीया यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .तसेच समाज कल्याण सचिव सुमित भांगे यांची खातेनिहाय चौकशी करून व मालमत्तेची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेल द्वारे केली आहे .
याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे .समाज कल्याण विभाग तसेच ” बार्टी ” पुणे येथील कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या अनेक वर्तमानपत्र व वेब न्यूजला बातम्या प्रसिद्ध होत आहेत .तेथील भ्रष्टाचाराच्या बातम्या येणे नित्याचे झाले आहे .दैनिक लोकमत या वर्तमानपत्राने अनुसूचित जातीचा 14,198 कोटी रुपये ( चौदा हजार एकशे अठ्यानव कोटी रुपये) निधी अखर्चीत राहिल्याची बातमी छापली आहे .तसेच समाज कल्याणचे सचिव सुमित भांगे यांची 500 कोटीपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता असल्याचे डेलीहंटने प्रसिद्ध केले आहे .
तसेच लिंगाळी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी अभ्यासिका सुरू करण्यास तांत्रिक मान्यता द्यावी याबाबतचा प्रस्ताव पुणे जिल्हा परिषदेने प्रादेशिक उपायुक्त (समाजकल्याण विभाग )सोलंकी यांच्याकडे 26 जून 2023 रोजी पाठवला आहे .परंतु या प्रस्तावावर प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त सोलंकी यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही व प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे .यामुळे हे अधिकारी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे दिसून येत आहे .हे समानतेच्या न्यायतत्वाला धरून नाही .त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून तसेच गुप्तचर यंत्रणेमार्फत यांच्या मालमत्तेची चौकशी करून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे .