बकरी ईद अनुषंगाने कुरेशी समाजाची बैठक, शासन आदेशांचे पालन करण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे आवाहन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
कोणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे व्हॉटसअप, ट्विटर, इन्सटाग्राम, फेसबुक, असे सोशल मिडीयावर संदेश अगर स्टेटस ठेवून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
पोलीस निरीक्षक संदीप पाटील
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहर पोलीस स्टेशन च्या वतीने बकरी ईद या सणाच्या अनुषंगाने दि 13 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता कुरेशी समाजातील मान्यवरांची बैठक घेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कोणत्याही घटनामुळे सामाजीक तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी व शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे असे आवाहन केले.
मा. पोलीस अधिक्षक श्री. एम. राजकुमार साहेब यांचे आदेश व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे साो. चाळीसगाव परीमंडळ चाळीसगाव तसेच श्री. अभयसिंह देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी चाळीसगांव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने कुरेशी समाजातील लोकांची मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. सदर मिटींग चाळीसगाव शहर पोस्टेला पार पडली.
सदर मिटींगच्या दरम्यान पोलीस निरीक्षक श्री. संदिप पाटील यांनी कोणत्याही घटनामुळे सामाजीक तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी व शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे तसेच राज्यात दिनांक 04 मार्च 2015 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा 1995 लागू करण्यात आहे. सदर सुधारीत अधिनियमाप्रमाणे कुठलेही गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करण्यास सक्त मनाई आहे तसेच जळगाव जिल्हात मा.जिल्हाधिकारी सो यांनी जळगाव जिल्हात दिनांक 8 जून 2023 रोजीचे रात्री 00.01 वा. पासुन ते दिनांक 22 जून 2023 रोजीचे 24.00 वा. पावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याचे देखील पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.