Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

बिलाखेड गावाचे शिवारात एका गावठी दारूच्या हातभट्टी वर कारवाई

0
0 0
Read Time3 Minute, 24 Second

चाळीसगांव(प्रतिनिधी):-चाळीसगाव तालुक्यात सद्या दारूचा पूर वाहत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 21 दिवसाचा लॉकडाऊन केला आहे जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व व्यवसाय बंद आहेत पण गावठी दारु मात्र धडाक्यात सुरू आहे असे चित्र निर्माण झाले आहे 2 दिवसापूर्वी ओझर येथे 10 गावठी दारू अड्डे पोलीस प्रशासनाने नष्ट केले.

आज रोजी पुन्हा सकाळी 10 वाजताचे सुमारास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांचे उपस्थितीत सोबत स पो नि मयूर भामरे, पोलिस अंमलदार राहुल गुंजाळ, पंढरीनाथ पवार, भटु पाटील, विनोद भोई, भूषण पाटील, व इतर पथकासह चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बिलाखेड गावाचे शिवारात नाल्याजवळच्या एका गावठी हातभट्टी दारूच्या भट्टीवर कारवाई करण्यात आली असून, सदर ठिकाणी कच्ये पक्के रसायन, गावठी हातभट्टीची तयार दारू, नवसागर, गूळ, प्लास्टिक ड्रम, लोखंडी बेरेल असे एकूण 11500 रुपयाचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे. 1) पंडित पुंजू सोनावणे
राहणार – बिलाखेड
2) प्रकाश उर्फ भुऱ्या पंडित सोनवणे
राहणार- बिलाखेड या आरोपींवर गुन्हा दाखल झल्यावर सदर आरोपीस ताब्यात घेण्यासाठी 11 वाजेच्या सुमारास वरील पोलीस पथक बिलाखेड येथे गेले असता,

त्यांच्या घरी गेले असता, आरोपींनी व त्यांचे घरातील दोन जणांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून, शासकीय कर्तव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करून, पोलीस पथकास अटकाव केल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात आली असून, सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून त्यांचेवर 186,332,353,427,504,506 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपीना अटक करून पुढील तपास सपोनि आशिष रोही करीत आहेत.

आरोपींची नावे-
1) पंडित पुंजू सोनावणे
राहणार – बिलाखेड
2) प्रकाश उर्फ भुऱ्या पंडित सोनवणे
राहणार- बिलाखेड
3) प्रदीप पंडित सोनवणे
राहणार- बिलाखेड
4)प्रमिलाबाई पंडित सोनवणे
राहणार- बिलाखेड.

चाळीसगाव शहर पोलीस आपले कर्तव्य धडाक्यात बजवत आहे एकीकडे कोरोनाशी युद्ध एकी कडे लोकांच्या जीवनाशी खेळणारे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: