अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-दि 16 सप्टेंबर 2021 गुरुवार रोजी बोरिबेल गावात चालणाऱ्या मटका अड्ड्यावर दौंड पोलिसांनी धाड टाकत 2 आरोपींवर गुन्हा दाखल
दौंड पोलिस स्टेशन हद्दीत बोरिबेल गावामध्ये लपून सट्टा मटका धंदा चालतो अशी गुप्त माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ डी बी पथकास आदेश देत चौकशी करून कारवाही करण्यास सांगितले होते त्या अनुषंगाने बोरिबेल गावच्या हद्दीत डी बी पथक गेले असता 2 आरोपी सट्टा मटका चा खेळ चालवत असल्याचे निर्देशास् आले त्यांना तात्काळ कारवाई साठी ताब्यात घेण्यात आले आरोपींची नावे 1) बापूसाहेब दिगंबर जगताप रा बोरिबेल ता दौंड जी पुणे 2) अनिल उमाजी जगताप रा बोरिबेल ता दौंड जी पुणे अशी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 1555 रू चां मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पो हवा सुभाष राऊत, पो ना किरण राऊत ,पो ना अमोल गवळी ,पो कॉ अमोल देवकाते व रवी काळे यांनी केली आहे.