मक्याचे बियाणे खराब दिल्याने खडकी बु . येथील शेतकऱ्यांचे नुकसान – शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी प स गटविकास अधिकारी यांना रयत सेनेची मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील खडकी बु येथील श्री अनिल लक्ष्मण कोल्हे या शेतकऱ्याने दि २० जून २०२२ रोजी सिजेंटा या कंपनीचे ३ थैली मक्याचे बियाणे खडकी बु . येथील किसान कृषी केंद्रातून खरेदी करून त्या बियाण्यांची चालू हंगामात शेतात पेरणी केली होती. हंगाम निघण्याच्या मार्गावर असताना पेरलेल्या मक्याचे पिक आले आहे म्हणून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी चाळीसगाव प स गटविकास अधिकारी यांना रयत सेनेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे
मक्याचे पिक आले आहे मात्र पिकाच्या तोटयाना मक्याचे कणसे आलीच नाही. तर काही ठिकाणी मक्याचे कनीस लहान आले त्यात मक्याचे दाणेच नसल्यामुळे जवळपास २ एकर वर शेतकऱ्यांने पेरलेले पिक उगवले आहे मात्र त्यात मक्याचे दाणेच नसल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे बोगस बियाणे देवून शेतकऱ्यांची बियाणे कंपनी कडून किसान कृषी केंद्रा मार्फत बोगस बियाणे विक्री करून फसवणूक झाली आहे. शेतकरी आपली व्यथा घेउन संबंधित कृषी केंद्रावर गेले तर त्याला उडवाउडवीचे उत्तर दिली गेली. संबंधित किसान कृषी केंद्र संचालकवर कारवाई करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा रयत सेना शेतकऱ्याला घेउन आपल्या पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन पुकारेल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास किसान कृषी केंद्र संचालक जबाबदार राहणार असल्याचे
चाळीसगाव प स गटविकास अधिकारी श्री वाळेकर यांना दि १२ रोजी रयत सेनेने निवेदनाद्वारे केली आहे निवेदनाच्या
माहितीस्तव प्रत तालुका कृषी अधिकारी चाळीसगाव.
कृषी अधिकारी प स चाळीसगाव यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर प्रदेश समंवयक पी एन पाटील,
प्रदेश सचिव ज्ञानेश्वर कोल्हे , जिल्हा अध्यक्ष संजय कापसे ,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड,अनिल कोल्हे,दिनेश चव्हाण ,तालुका अध्यक्ष वैद्यकीय पंकज पाटील,तालुका उपाध्यक्ष भरत नवले ,मुकुंद पवार, शहर अध्यक्ष छोटु अहिरे ,युवक शहर उपाध्यक्ष सागर जाधव,श्रीकांत तांबे,प्रतिक पाटील,गौरव पाटील, तालुका सचिव चंद्रकांत बागुल चांभार्डी , वाघळी चे सरपंच सोनु पैलवान ,तांबोळे मा. सरपंच देवानाना जाधव,खडकी बु पोलीस पाटील विनायक मांडोळे अदि च्या स्वाक्षऱ्या आहेत.